
पुणे पीसीएमसी न्यूज 24:
पुणे : प्रतिनिधी : औंध परिसरातील नागरस रस्त्यावर सध्या अपघातांची मालिका सुरू झाली आहे, वाढती लोकसंख्या व वाहने तसेच वाहतुकीच्या नियमसंबंधी च्या त्रुटी यास कारणीभूत ठरत आहे. काही दिवसांपूर्वी नागरस रस्त्यावर एका अपघातात एक जेष्ठ नागरिकास आपला जीव गमावावा लागला नाहक बळी गेला याकरिता याठिकाणी लक्ष वेधून येथील समस्या कश्या प्रकारे सोडवता येईल यासाठी शिवाजीनगर मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी नुकतीच पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची भेट घेऊन याबाबत सविस्तर चर्चा करून येथील समस्या सोडवण्यासाठी आयुक्तांना निवेदन दिले .
‘रस्त्याची खराब अवस्था, रोड व साईड पट्टी यामधील लेव्हलमधील तफावत, अपूर्ण पादचाऱ्यांची व्यवस्था व वाहतूक नियोजनातील त्रुटी या सर्व गोष्टी या दुर्घटनेला कारणीभूत ठरल्या.’
▪️ शहरातील रस्ते खड्डेमुक्त करणे
▪️ साईड पट्टी व रस्त्याच्या लेव्हलमध्ये समतोल ठेवणे
▪️ अपूर्ण रस्ते रुंदीकरणाचे काम तातडीने सुरू करणे
▪️ ड्रेनेज व झाकणांची समांतर मांडणी करणे
▪️ सुरक्षित, खड्डेमुक्त व अतिक्रमणमुक्त फूटपाथ तयार करणे
▪️ चौकातील पादचारी मार्गाच्या वळणांना योग्य नियोजन करणे
▪️ सिग्नल सुरू ठेवणे व आजूबाजूचे पार्किंग काढणे
▪️ गर्दीच्या चौकांमध्ये वाहतूक पोलीस वा वॉर्डन नेमणे
▪️ औंधसाठी सक्षम पार्किंग व्यवस्था तयार करणे
▪️ विद्यापीठ चौक ते ब्रेमन चौक रस्त्यावरील अतिक्रमण हटवणे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
प्रसंगी प्रमुख उपस्तिथी सचिन वाडेकर, अनिल भिसे, .उत्तम बहिरट यांची होती

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏



















