नागरिकांच्या सुरक्षित व विनाअडथळा प्रवासासाठी महापालिकेची मोहीम तीव्र; क्षेत्रीय कार्यालयनिहाय कारवाईचा आढावा
पिंपरी | प्रतिनिधी : दि. 26 मे 2026 पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून शहरातील पदपथ अतिक्रमणमुक्त करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत असून, पदपथांवर अतिक्रमण करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. दुकानांसमोर साहित्य ठेवून अथवा अनधिकृतपणे जागा व्यापून नागरिकांच्या वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या व्यावसायिकांनी पुढील १५ दिवसांत अतिक्रमण स्वखर्चाने हटवावे, अन्यथा महापालिकेकडून थेट कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट संकेत आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले.
पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात आयोजित बैठकीत आयुक्तांनी क्षेत्रीय कार्यालयनिहाय सुरू असलेल्या अतिक्रमण कारवाईचा आढावा घेतला. यावेळी शहरातील पदपथ नागरिकांसाठी सुरक्षित आणि मोकळे ठेवण्यावर विशेष भर देण्यात आला.
महापालिकेने सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या माध्यमातून अतिक्रमणमुक्त पदपथ मोहीम हाती घेतली असून, नागरिकांना चालण्यासाठी विनाअडथळा सुविधा उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. वारंवार त्याच ठिकाणी अतिक्रमण होऊ नये, यासाठी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अधिक दक्षता घेण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या.
तसेच शहरातील हॉकर झोन निश्चित करून त्याठिकाणी होकर्स झोन तयार करावा. शहराचा बकालपणा वाढणार नाही तसेच हॉकर्स मुळे रहादरीला अडथळा होणार नाही यासाठी सर्व कार्यालयनिहाय फिरते पथक नेमून त्यावर सातत्याने देखरेख ठेवावी असे निर्देश ही आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहे.

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏






















