Homeपुणेपुण्यात मुस्लिम समाजाची गाईला ‘राष्ट्रीय प्राणी’ घोषित करण्याची मागणी

पुण्यात मुस्लिम समाजाची गाईला ‘राष्ट्रीय प्राणी’ घोषित करण्याची मागणी

सामाजिक सलोखा, शांतता आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

पुणे | प्रतिनिधी : दि. 26 मे 2026                    गाईच्या संरक्षणासंदर्भात देशभरात सुरू असलेल्या विविध चर्चांच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील मूलनिवासी मुस्लिम मंचाच्या वतीने गाईला ‘राष्ट्रीय प्राणी’ घोषित करण्याची मागणी करण्यात आली. यासंदर्भात पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना निवेदन देण्यात आले.
संघटनेच्या वतीने सांगण्यात आले की, देशात सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि शांतता कायम राहावी, तसेच कोणत्याही प्रकारचा तणाव किंवा गैरसमज निर्माण होऊ नये, यासाठी केंद्र सरकारने या विषयावर स्पष्ट धोरण जाहीर करावे. गाईच्या संरक्षणाची जबाबदारी अधिकृत यंत्रणांकडे प्रभावीपणे राहावी आणि कायदा हातात घेण्याच्या घटनांना आळा बसावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
निवेदनात सर्व धर्मांचा आदर राखत शांतता आणि मानवतेचा संदेश देण्यात आला. “धर्म कोणताही असो, मानवी जीवन सर्वांत महत्त्वाचे आहे. समाजात परस्पर विश्वास आणि सौहार्द टिकून राहणे आवश्यक आहे,” अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

या आंदोलनाचे नेतृत्व मूलनिवासी मुस्लिम मंचाचे अध्यक्ष अंजुम इनामदार आणि जमीयत उलेमा हिंदचे हाफिज किफायतुल्लाह यांनी केले. यावेळी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य मौलाना निजामुद्दीन फकृद्दीन, कारी मुबशीर, सोहेल खान, समाजसेविका शाहीन सिंदगी, राजन नायक, विष्णू गरुड, जाहिद शेख, मेहबूब नदाफ, हशीम शेख, इब्राहिम यवतमाळवाला, मोईनुद्दीन शेख, नदीम मेमन आणि सलीम मौला पटेल यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
यावेळी प्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन सादर केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!