हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 10 जुलै 2026 सलग चार दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे नेरे गावातील मुख्य रस्ता तसेच शिंदेवस्ती परिसरातील अनेक रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली होती. रस्त्यावर पाणी साचल्याने नागरिकांना तसेच वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.


ही परिस्थिती लक्षात घेऊन नेरे गावचे माजी सरपंच सचिन जाधव आणि युवा उद्योजक तेजस शिंदे यांनी स्वखर्चातून रस्त्यावरील साचलेले पाणी काढण्यासह मुरूम टाकून रस्ते वाहतुकीसाठी सुरळीत करण्याचे काम हाती घेतले. या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या कामाच्या वेळी दत्ता जाधव, प्रमिला घोडेकर, दत्ता गाढवे, जालिंदर जाधव, निलेश जाधव, अजित ओव्हाळ, गणेश शिंदे, समीर जाधव, सुनील जाधव, हिरामण चंदन आणि मारुती कुंभार उपस्थित होते.
पावसामुळे निर्माण झालेल्या अडचणीच्या काळात सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत रस्ते दुरुस्तीसाठी पुढाकार घेतल्याबद्दल परिसरातील नागरिकांकडून या उपक्रमाचे स्वागत होत असून, गावाच्या विकासासाठी अशा लोकसहभागातून होणारे प्रयत्न प्रेरणादायी असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏

















