HomeपुणेGrow and Flourish' थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                            

पुणे | प्रतिनिधी: दि. 20 जुलै 2026
12 जुलै रोजी इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्ज, डिस्ट्रिक्ट 313 यांच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून डिस्ट्रिक्ट चेअरमन डॉ. दिपशिखा पाठक उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली.   कार्यक्रमाच्या प्रारंभी माजी अध्यक्षा उज्ज्वला नवले यांनी वर्षभरात राबविण्यात आलेल्या विविध सामाजिक उपक्रमांचा आढावा घेत क्लबच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. तर क्लबच्या चार्टर प्रेसिडेंट सुविधा नाईक यांनी पुणे विंग्जच्या गेल्या पाच वर्षांच्या प्रेरणादायी प्रवासाचा आढावा उपस्थितांसमोर मांडला.
डॉ. दिपशिखा पाठक यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात असोसिएशनच्या प्रेसिडेंट विनूथा हरीश यांच्या “महिला सबलीकरण, सक्षमीकरण आणि सशक्तीकरण” या त्रिसूत्रीला विविध सामाजिक प्रकल्पांच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन केले. तसेच इंटरनॅशनल इनरव्हीलच्या “Grow and Flourish” या वर्षभराच्या थीमवर सविस्तर मार्गदर्शन केले.
नवीन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे :
अध्यक्ष – सुनंदा डेरे
उपाध्यक्षा – शिल्पा फुकणे
सचिव – लता मोहोळ
खजिनदार – सुजाता शुक्ला
आयएसओ – सुविधा नाईक
संपादक – गौरी गद्रे

पदग्रहण सोहळ्यादरम्यान सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबविण्यात आले. अंगणवाडी शाळेला व्हाईट बोर्ड भेट देण्यात आला. हिरे हायस्कूलमधील दोन विद्यार्थ्यांना वैशाली पाटील यांच्या प्रायोजकत्वातून शैक्षणिक साहित्य प्रदान करण्यात आले. पाच वर्षीय आहान मोदी याला उल्लेखनीय कामगिरीबद्दल सन्मानपत्र देण्यात आले. तसेच “नो प्लास्टिक” या उपक्रमांतर्गत सर्व सदस्यांना ज्यूटच्या पिशव्यांचे वितरण करण्यात आले.
क्लबच्या सदस्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन अनुराधा हाटकर यांनी केले.
सेवाभाव, सामाजिक उत्तरदायित्व आणि नव्या उमेदीचा प्रेरणादायी संदेश देणारा हा पदग्रहण सोहळा उपस्थितांच्या स्मरणात राहणारा ठरला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

सिंहगडावरील कथित वादग्रस्त फलक हटविला; अज्ञात व्यक्तींचा शोध सुरू – पुणे ग्रामीण पोलीस

खडकी | प्रतिनिधी : दि. 15 जुलै 2026              सिंहगड किल्ला परिसरात लावण्यात आल्याचा दावा असलेल्या वादग्रस्त फलक प्रकरणात...

error: Content is protected !!