पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026 रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त रविवार, २६ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता नू. म. वि. प्रशाला, बाजीराव रोड, पुणे येथे भव्य वाद्यपूजन सोहळा आणि ‘पहिले आवर्तन’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पारंपरिक वाद्यसंस्कृतीचा प्रचार-प्रसार करण्याबरोबरच तरुणांना सर्जनशीलतेसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या सोहळ्यात पद्मश्री तारपा वादक भिकल्या लाडक्या धिंडा यांचा सत्कार मा. चंद्रकांतदादा पाटील (उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा संसदीय कार्यमंत्री, महाराष्ट्र राज्य व पालकमंत्री, पुणे जिल्हा) यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर मंजुषाताई नागपुरे उपस्थित राहणार असून अपूर्व दत्तात्रय खाडे यांचे विशेष सहकार्य लाभणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टचे संस्थापक-अध्यक्ष अमर लक्ष्मण भालेराव (तात्या) यांनी केले आहे.
दशकपूर्तीनिमित्त ट्रस्टतर्फे आकर्षक इन्स्टाग्राम रील स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्यास ₹५,००१, द्वितीय ₹३,००१ आणि तृतीय ₹२,००१ रोख पारितोषिकासह ट्रॉफी देण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांनी आपली रील ट्रस्टच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजसोबत Collaboration करून पोस्ट करणे आवश्यक आहे. स्पर्धेचा निकाल २८ जुलै २०२६ रोजी जाहीर करण्यात येणार असून प्रवेश पूर्णपणे मोफत आहे.
रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टने पुणे शहरातील वाद्यप्रेमी, गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, वादक तसेच नागरिकांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन केले आहे.

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏


















