Homeखडकीखडकी बाजार येथील 'कन्नन इडली सेंटर वर अन्न औषध प्रशासनाची कारवाई.अन्न सुरक्षा...

खडकी बाजार येथील ‘कन्नन इडली सेंटर वर अन्न औषध प्रशासनाची कारवाई.अन्न सुरक्षा कायदा भंग : अन्न व्यवसाय बंद करण्याचे आदेश

खडकी / प्रतिनिधी :दि. २४ नोव्हेंबर २०२५            अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 आणि नियम 2011 अंतर्गत खडकी बाजार येथील ‘कन्नन ईडली सेंटर’ न्यू एक्सेलसिअर, खडकी पुणे येथे चालणाऱ्या स्नॅक्स सेंटर वर अन्न औषध प्रशासनाच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे. संबंधित तक्रारींची पडताळणी करण्यासाठी अन्न सुरक्षा अधिकारी लक्ष्मीकांत सावळे यांनी 21नोव्हेंबर2025 रोजी ऑनलाईन तपासणी केली होती.
अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण (FSSAI) अंतर्गत चालणाऱ्या तपासणीमध्ये, परवाना/नोंदणी न घेता अवैधपणे अन्न व्यवसाय चालवल्याचे आढळून आले. अन्न सुरक्षा कायद्यानुसार, कोणतीही खानावळ, दुकान, सेंटर किंवा अन्नाशी संबंधित व्यवसाय FSSAI परवाना अथवा नोंदणीशिवाय चालवणे कायदेशीर गुन्हा आहे.
तपासात ‘कन्नन इडली सेंटर’ ला तात्काळ अन्न व्यवसाय बंद करण्याचे निर्देश देण्यात आले व परवाना घेईपर्यंत कोणतीही अन्न विक्री अथवा प्रक्रिया करण्यास मनाई केली आहे. सदर कार्यवाही अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 तसेच अन्न सुरक्षा व मानके नियम 2011 अंतर्गत करण्यात आली असल्याचे पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.
अधिकाऱ्यांनी पुढील काळात नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई होणार असल्याचा इशाराही दिला आहे

याबाबत खडकीतील सामाजिक कार्यकर्ते शहाबाज सय्यद यांनी ‘कन्नन इडली सेंटर’ मध्ये खराब कांदे व किचन मध्ये अस्वछता बाबत दि. ६ नोव्हेंबर २०२५ ला मेल करून तक्रार केली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!