Homeक्राईमखडकीतील दर्गा वसाहत घटनेचा निषेध; शांतता व कायद्याचे पालन करण्याचे आवाहन

खडकीतील दर्गा वसाहत घटनेचा निषेध; शांतता व कायद्याचे पालन करण्याचे आवाहन

प्रकरणी गुन्हा दाखल; पोलिस तपास सुरू, नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन.

खडकी | प्रतिनिधी : दि. २२ जून २०२६ : खडकी बाजार परिसरातील दर्गाह वसाहत भागात घडलेल्या दगडफेक व तोडफोडीच्या घटनेबाबत मिस फरहा चॅरिटेबल फाउंडेशनने तीव्र निषेध व्यक्त केला असून नागरिकांनी शांतता राखून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, परिसरात काही समाजकंटकांकडून गोंधळ निर्माण झाल्याने तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. घटनेची माहिती मिळताच खडकी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.
या प्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे. काही संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच घटनेत सहभागी असलेल्या इतर व्यक्तींचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले.
मिस फरहा चॅरिटेबल फाउंडेशनचे संचालक अन्वर शेख यांनी या घटनेचा निषेध करताना सांगितले की, खडकी आणि पुणे शहर हे सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि विविधतेत एकता यासाठी ओळखले जाते. अशा घटना समाजातील ऐक्याला धक्का देणाऱ्या असून कोणत्याही प्रकारची हिंसा किंवा द्वेषपूर्ण कृत्ये स्वीकारार्ह नाहीत.
फाउंडेशनने नागरिकांना अफवा, अपप्रचार किंवा सोशल मीडियावरील भडकाऊ संदेशांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. कोणतीही माहिती अधिकृत स्रोतांकडूनच पडताळून घ्यावी तसेच कायदा हातात न घेता पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले.
दरम्यान, पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू असून कायद्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.
हिंसेला नकार, शांततेला स्वीकार; द्वेषाला नकार, बंधुभावाला आधार”, असा संदेश यावेळी देण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!