Homeपुणेबालगंधर्व परिवार पुरस्कारासाठी प्रसिद्ध तुंबा प्लेअर विजय भोंडे यांची निवड

बालगंधर्व परिवार पुरस्कारासाठी प्रसिद्ध तुंबा प्लेअर विजय भोंडे यांची निवड

बालगंधर्व रंगमंदिर वर्धापनदिन महोत्सव २०२६ निमित्त सन्मान; २५ जून रोजी पुरस्कार प्रदान

पुणे | प्रतिनिधी : दि. 20 जून 2026                  बालगंधर्व परिवार ट्रस्ट, महाराष्ट्र आयोजित बालगंधर्व रंगमंदिर वर्धापनदिन महोत्सव २०२६ निमित्त ज्येष्ठ तबलावादक व ऑर्केस्ट्रा क्षेत्रातील मान्यवर कलाकार विजय भोंडे यांची प्रतिष्ठेच्या ‘बालगंधर्व परिवार पुरस्कार’ साठी निवड करण्यात आली आहे.

ट्रस्टचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी दिलेल्या पत्रानुसार, बालगंधर्व रंगमंदिर हे महाराष्ट्रातील कलाकारांच्या मनातील एक आदरस्थान असून रंगभूमी, संगीत व विविध कलाक्षेत्राशी संबंधित असलेल्या प्रत्येकासाठी त्याला विशेष महत्त्व आहे. गेली ५८ वर्षे दिमाखात उभ्या असलेल्या या वास्तूचा वर्धापन दिन महोत्सव २४, २५ व २६ जून २०२६ या कालावधीत साजरा केला जाणार आहे.
या तीन दिवसीय महोत्सवात नाटक, तमाशा, लावणी, लोकधारा, ऑर्केस्ट्रा, मराठी वाद्यवृंद, कलापथक, शाहीरी, झाडीपट्टी कलाकार, कोकण दशावतारी कलाकार, वाघ्या -मुरळी, गोंधळी, जादूगार, भजनी मंडळे, भारूड तसेच आदिवासी कलावंत आदी विविध कलाक्षेत्रांतील कलाकार सहभागी होणार आहेत. कोणताही भेदभाव नसलेले हे एक सांस्कृतिक संमेलन मानले जाते.
बालगंधर्व रंगमंदिर वर्धापनदिनानिमित्त विविध कलांच्या सादरीकरणासोबतच अनेक ज्येष्ठ व मन्यवर कलाकारांचा गौरव करण्यात येणार आहे. कला क्षेत्रासाठी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत विजय भोंडे यांची बालगंधर्व परिवार पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
सदर पुरस्कार वितरण सोहळा दि. २५ जून २०२६ रोजी रात्री ९.३० वाजता आयोजित करण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!