खडकी | प्रतिनिधी : दि. 15 जुलै 2026 सिंहगड किल्ला परिसरात लावण्यात आल्याचा दावा असलेल्या वादग्रस्त फलक प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांकडून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित फलक किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील वाहनतळ (पार्किंग एरिया ) शेजारी असलेल्या जुन्या लोखंडी फलकावर अज्ञात व्यक्तींनी लावला होता.
पोलिसांच्या माहितीनुसार, स्थानिक वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर संबंधित फलक तात्काळ हटविण्यात आला.
दरम्यान, या फलकाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर मिस फरहा चॅरिटेबल फाऊंडेशनने पुणे ग्रामीण पोलीस प्रशासनाकडे छायाचित्रांसह सविस्तर तक्रार दाखल केली. संस्थेने पोलीस अधीक्षक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, हवेली पोलीस ठाणे तसेच पुणे ग्रामीण पोलीस कंट्रोल रूमकडे ई-मेलद्वारे तक्रार पाठविल्याची माहिती दिली आहे. तसेच पोलीस कंट्रोल रूमच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावरही संबंधित माहिती पाठविण्यात आल्याचे संस्थेने म्हटले आहे.
पुणे ग्रामीण पोलिसांच्या माहितीनुसार, फलक लावणाऱ्या अज्ञात व्यक्तींचा शोध घेण्यासाठी परिसरातील प्रवेश व निर्गमन मार्गांवरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे. संबंधित व्यक्तींची ओळख पटवून त्यांच्याविरुद्ध लागू असलेल्या कायद्यानुसार आवश्यक ती कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
मिस फरहा चॅरिटेबल फाऊंडेशनने या प्रकरणाचा पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचे सांगितले असून, निष्पक्ष तपास आणि कायद्यानुसार कारवाई होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. संस्थेने या प्रकरणात तातडीने दखल घेतल्याबद्दल पुणे ग्रामीण पोलिसांच्या प्रतिसादाचे स्वागतही केले आहे.
(टीप : वरील वृत्तातील माहिती पुणे ग्रामीण पोलिसांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार व संबंधित संस्थेने दिलेल्या निवेदनाच्या आधारे प्रसिद्ध करण्यात येत आहे. तपास सुरू असून पुढील अधिकृत माहितीनुसार बातमी प्रसिद्ध करण्यात येईल.)

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏


















