Homeपिंपरी चिंचवडनेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५००...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश व ३,००० छत्र्यांचे मोफत वाटप

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा 

हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026              नेरे गावचे सुपुत्र, माजी आदर्श सरपंच तथा युवा उद्योजक मा. सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले. या निमित्ताने जिल्हा परिषद शाळा नेरे गावठाण व दत्तवाडी येथील विद्यार्थ्यांना सुमारे ५०० शालेय गणवेशांचे, तसेच समस्त नेरे ग्रामस्थांना ३,००० छत्र्यांचे मोफत वाटप करण्यात आले.

सामाजिक बांधिलकी जपत सचिनभाऊ जाधव हे गावातील नागरिकांसाठी सातत्याने विविध लोकोपयोगी उपक्रम राबवत असतात. सरपंचपदाच्या कार्यकाळात त्यांनी रस्ते, वीज, पाणीपुरवठा, पायाभूत सुविधा आदी विकासकामांना गती देत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष प्रयत्न केले. अनेक विकासकामे स्वखर्चातून पूर्ण करून त्यांनी समाजसेवेचा आदर्श निर्माण केला आहे.
यावेळी जिल्हा परिषद गटनेते शिवाजीराव बुचडे पाटील, पंचायत समिती सदस्या ऐश्वर्याताई वाघमारे, संत तुकाराम साखर कारखान्याचे संचालक दत्ताभाऊ जाधव, सरपंच वंदनाताई जाधव, माजी सरपंच दिगंबर जाधव, माजी उपसरपंच दत्ताभाऊ गाढवे, अरुण ढमाले, निलेश विलास जाधव, भाजपा प्रवक्ते साहेबराव जाधव, उपसरपंच विदुर जाधव, जालिंदर जाधव, राजकीय सल्लागार महेश गोरे, मनसे उपाध्यक्ष गणेश शिंदे, भाजप नेते राहुल जाधव, युवराज पायगुडे, युवा उद्योजक तेजस शिंदे, उपसरपंच अजित ओव्हाळ, हभप लक्ष्मण जाधव, दत्तात्रय शंकर जाधव, दत्तात्रय विलास जाधव, युवा उद्योजक सुनील जाधव, उद्योजक वैभव राऊत, युवा उद्योजक गणेश जाधव, माजी उपसरपंच शरद शिंदे, तुकाराम दातीर, विराज सातपुते, माऊली दातीर, कृष्णा जाधव, अनिल जाधव, भरत जाधव, विश्वास जाधव, अक्षय गाढवे, समीर जाधव, उद्योजक नवनाथ जाधव, हिरामणभाऊ जाधव, दशरथ खाणेकर, संभाजी ज्ञानोबा जाधव, विनोद आब्बा जाधव, महेश जाधव, बबन जाधव, संभाजीभाऊ जाधव, जगन्नाथ जाधव, बाळासाहेब सुर्वे यांच्यासह नेरे गावातील आजी-माजी सरपंच, उपसरपंच, विविध पक्षांचे पदाधिकारी, ग्रामस्थ आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या सेवाभावी उपक्रमामुळे विद्यार्थी व ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. उपस्थित मान्यवरांनी सचिनशेठ जाधव यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
मा. सचिनशेठ जाधव यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा! त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि समाजसेवेची अखंड प्रेरणा लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.                                                                                पुणे पीसीएमसी न्यूज 24                                           संपादक : हरीश शर्मा                                                 9822220090

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

सिंहगडावरील कथित वादग्रस्त फलक हटविला; अज्ञात व्यक्तींचा शोध सुरू – पुणे ग्रामीण पोलीस

खडकी | प्रतिनिधी : दि. 15 जुलै 2026              सिंहगड किल्ला परिसरात लावण्यात आल्याचा दावा असलेल्या वादग्रस्त फलक प्रकरणात...

error: Content is protected !!