Homeखडकीखडकी बस स्थानकासमोरील दुर्दशेमुळे नागरिक हैराण; तातडीने दुरुस्तीची राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी

खडकी बस स्थानकासमोरील दुर्दशेमुळे नागरिक हैराण; तातडीने दुरुस्तीची राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी

फुटलेल्या गटारी, तुंबलेले ड्रेनेज आणि उघड्या कचराकुंडीमुळे आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.

खडकी | प्रतिनिधी : दि. 3 जुलै 2026
खडकी बाजार येथील पीएमपीएमएल बस स्थानकासमोरील परिसराची दयनीय अवस्था नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. खडकी बाजाराकडे प्रवेश करताना फुटलेले ड्रेनेज, तुटलेल्या गटारी, उघडी कचराकुंडी आणि पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा नसल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात घाण व साचलेले पाणी दिसून येत आहे. त्यामुळे या मार्गाने ये-जा करणाऱ्या नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, पावसाळ्यापूर्वी आवश्यक देखभाल आणि दुरुस्तीची कामे न झाल्यामुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून कचरा उचलला जात असला तरी नागरिकांकडून पुन्हा उघड्यावर कचरा टाकला जात असल्याने परिसरात वर्षभर अस्वच्छता कायम राहते. थोडासा पाऊस पडला तरी या ठिकाणी गटाराचे पाणी रस्त्यावर येत असल्याने पादचाऱ्यांना आणि बसस्थानकाकडे जाणाऱ्या प्रवाशांना अक्षरशः घाणीमधून मार्ग काढावा लागत आहे.
या गंभीर समस्येकडे लक्ष वेधत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे खडकी विभाग अध्यक्ष लोकेश मोरे यांनी खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाकडे तातडीने दुरुस्तीची कामे हाती घेण्याची मागणी केली आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेऊन फुटलेल्या गटारी, ड्रेनेज व्यवस्था आणि परिसराची स्वच्छता यावर त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.
आता खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासन या समस्येची कितपत दखल घेते आणि नागरिकांना या त्रासातून कधी दिलासा मिळतो, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

यासंदर्भात अधिक माहिती घेण्याकरिता खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे आरोग्य निरीक्षक वैभव कदम यांच्याशी भ्रमणध्वनी वरून संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!