Homeपुणेराजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजनेसाठी १ ते...

राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजनेसाठी १ ते ३१ जुलैदरम्यान ऑनलाइन अर्ज; पात्र लाभार्थ्यांना दरमहा ५ हजार रुपयांचे मानधन

ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांना आर्थिक आधार; ‘राजर्षी शाहू महाराज मानधन सन्मान’ योजनेसाठी अर्ज सुरू

पुणे, दि. ३० : साहित्य, कला आणि संस्कृती क्षेत्रात दीर्घकाळ योगदान देणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांना आर्थिक आधार देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या ‘राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान’ योजनेसाठी १ जुलै ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत दरमहा रु. ५,००० इतके मानधन प्रदान करण्यात येणार आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय ५० वर्षांपेक्षा अधिक असणे आवश्यक असून दिव्यांग कलाकारांसाठी वयोमर्यादा ४० वर्षे ठेवण्यात आली आहे. तसेच कला किंवा साहित्य क्षेत्रात किमान १५ वर्षांचे उल्लेखनीय योगदान, वार्षिक उत्पन्न रु. ६० हजारांपेक्षा कमी आणि अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे बंधनकारक आहे.
योजनेत विधवा, परित्यक्ता, दिव्यांग तसेच वयोवृद्ध साहित्यिक व कलाकारांना प्राधान्य देण्यात येणार असून त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यासोबतच आर्थिक पाठबळ देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.
इच्छुक व पात्र साहित्यिक आणि कलाकारांनी महाराष्ट्र शासनाच्या ‘आपले सरकार’ पोर्टलवर ३१ जुलै २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करावेत. अर्जासोबत वयाचा पुरावा, आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, बँक पासबुक तसेच आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.
योजनेबाबत अधिक माहितीसाठी संबंधित कार्यालयाशी संपर्क साधावा. जास्तीत जास्त पात्र साहित्यिक व कलाकारांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सदस्य सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) भूषण जोशी यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!