खडकी / प्रतिनिधी : दि. २४ नोव्हेंबर २०२५ मालेगाव तालुक्यातील डोंगराळ भागात एका चिमुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचार आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण समाजाला हादरवून सोडले आहे. या क्रूर कृत्याविरोधात तीव्र संताप व्यक्त करत आरोपींवर तातडीने आणि कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.

व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंक ओपन करा.https://youtube.com/shorts/kgc1HJalFkI?si=vxe_O1pxIP7T0Wxa
या घटनेमुळे बालसुरक्षेच्या उणिवा पुन्हा एकदा समोर आल्या असून प्रशासन, कायदा यंत्रणा तसेच समाजाने प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक सक्षम करण्याची गरज झाली आहे. याकरिता समस्त खडकीकरांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते रिकेश पिल्ले यांच्या नेतृत्वाने कॅडेल मार्च काढण्यात आले. संपूर्ण खडकी बाजारातून महिला मुले ज्येष्ठ नागरिक यामध्ये सामील झाले होते. सर्वांनी मेणबत्ती लाऊन श्रद्धांजली वाहण्यात आली व खडकीकरांच्या वतीने सदर घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला. आरोपींवर जलद व कडक कायदेशीर कारवाई करावी. पीडित बालकाला न्याय ,मिळावा अशी मागणी करण्यात आली.
खडकीतील मान्यवर, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, महिला वर्ग, युवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून शांततेत निषेध नोंदवला.
ही घटना प्रत्येक पालक आणि नागरिकाच्या मनात भीती व वेदना निर्माण करणारी असून धोका कोणाच्याही घरापर्यंत पोहोचू शकतो या जाणिवेने खडकीकर एकजुटीने उभे राहिल्याचे दिसून आले. निरपराध बालकाला न्याय मिळवून देणे ही सामूहिक जबाबदारी असल्याचे सर्वांनी स्पष्ट केले.

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏

















