खर्च कपातीसाठी व्हिडिओ कॉन्फरन्स, दौरे मर्यादित; मात्र बँक सेवा सुरळीत सुरू राहणार
पुणे पीसीएमसी न्यूज 24.live | ऑनलाईन वृत्तसेवा : देशातील सरकारी बँकांना केंद्र सरकारने लॉकडाऊनसारखे आदेश दिल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू असताना याबाबत कोणतीही अधिकृत बंदी किंवा निर्बंध लागू करण्यात आलेले नाहीत.
मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारच्या वित्त विभागाने सरकारी बँका, विमा कंपन्या आणि वित्तीय संस्थांना खर्च नियंत्रणासाठी काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यामध्ये बैठका ऑनलाइन घेणे, अनावश्यक प्रवास टाळणे तसेच कार्यालयांमध्ये टप्प्याटप्प्याने इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवणे यांचा समावेश आहे.
या निर्णयामागे जागतिक आर्थिक परिस्थिती, वाढता खर्च आणि बचतीवर भर ही प्रमुख कारणे असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, याचा सर्वसामान्य ग्राहकांच्या दैनंदिन बँक व्यवहारांवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर “बँका बंद होणार”, “लॉकडाऊनसारखे निर्बंध येणार” अशा अफवा पसरत असल्या तरी नागरिकांनी अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन करण्यात येत आहे. �

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏






















