Homeखडकीखडकी कॅन्टोन्मेंट बोर्डातील दुकानांच्या भाडे वाटपावर गंभीर आरोप; चौकशीची मागणी

खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डातील दुकानांच्या भाडे वाटपावर गंभीर आरोप; चौकशीची मागणी

भाडे तत्वावरील दुकान वाटप प्रक्रियेत अनियमितता, भेदभाव व पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोप

खडकी | प्रतिनिधी : दि. 19 मे 2026
खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या दुकानांच्या भाडे तत्वावरील वाटप प्रक्रियेत गंभीर अनियमितता, भेदभाव आणि पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोप करत अभिजीत मनोज गडांकुश यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. तसेच या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
तक्रारीमध्ये नमूद केल्यानुसार, एका विशिष्ट वर्गासाठी तब्बल 55 दुकाने भाडे तत्वावर देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. राष्ट्रीय खेळाडूंसाठी आरक्षित कोटा राखीव ठेवण्यात आला असताना, मागासवर्गीय, खडकीतील रहिवासी, महिला आणि  व्यक्तींसाठी कोणतीही दुकाने उपलब्ध करून देण्यात आलेली नसल्याचे पत्रात म्हटले आहे. त्यामुळे संविधानातील समानतेच्या तत्त्वांचे उल्लंघन होत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
तसेच डोमिसाइल (रहिवाशी दाखला ) अट केवळ फेरीवाले आणि सामान्य रहिवाशांवर लागू करण्यात येत असून, दुकानमालक किंवा भाडेकरूंवर ती लागू नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही दुहेरी भूमिका असल्याचे गडांकुश यांनी म्हटले आहे.
लिलाव प्रक्रिया जाणूनबुजून विलंबित करून काही स्थानिक प्रस्थापित आणि विशिष्ट लोकांना फायदा पोहोचवण्यात येत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. प्रथम विद्यमान दुकानदारांवर डोमिसाइलसह इतर अटी कठोरपणे लागू करण्यात येतात, मात्र त्यानंतर नवीन अर्जदारांवर त्या अटी शिथिल केल्या जात असल्याचा मुद्दाही तक्रारीत उपस्थित करण्यात आला आहे.
मूळ मालकांनी दुकाने भाडे तत्वावर देऊन कॅन्टोन्मेंट बोर्डाचे आर्थिक नुकसान केल्याचा आरोप करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. गेल्या पाच वर्षांत (2021 ते 2026) दुकानांसाठी किती अर्ज प्राप्त झाले, कोणत्या वर्गातील अर्ज होते आणि त्यावर काय कारवाई करण्यात आली याची संपूर्ण माहिती जाहीर करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
सध्या आठ दुकाने रिक्त असल्याचे समजत असून, त्यांचा लिलाव कधी व कोणत्या पद्धतीने होणार याची माहिती नागरिकांना देण्यात यावी, अशी मागणीही पत्राद्वारे करण्यात आली आहे. सर्व रिक्त दुकाने पारदर्शक पद्धतीने लिलाव प्रक्रियेतून स्थानिक नागरिकांना प्राधान्य देऊन वाटप करण्यात यावीत, असेही निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान, सात दिवसांच्या आत योग्य कारवाई न झाल्यास खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशाराही तक्रारदारांनी दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!