Homeपिंपरी चिंचवडक्रिकेटचा महासंग्राम गाजला! ‘आमदार लक्ष्मणभाऊ जगताप चषक २०२६’चा दिमाखदार समारोप; लाखोंची बक्षिसे,...

क्रिकेटचा महासंग्राम गाजला! ‘आमदार लक्ष्मणभाऊ जगताप चषक २०२६’चा दिमाखदार समारोप; लाखोंची बक्षिसे, बुलेटवर खेळाडूंची स्वारी

९ लाखांची बक्षिसे, ३ बुलेट गाड्यांचा जल्लोष; केदार जाधव, आमदार शंकर जगताप यांच्या उपस्थितीत नवी सांगवीत क्रिकेट महोत्सवाचा थाटात समारोप

पिंपळे गुरव | प्रतिनिधी : दि. २५ एप्रिल २०२६      पिंपरी-चिंचवडच्या क्रीडा विश्वातील प्रतिष्ठेची स्पर्धा ठरलेल्या आमदार लक्ष्मणभाऊ जगताप चषक २०२६ या भव्य क्रिकेट स्पर्धेचा सांगता समारंभ नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. तब्बल ९ लाख रुपयांची रोख बक्षिसे आणि ३ रॉयल एनफिल्ड बुलेट गाड्या देऊन विजेत्यांचा गौरव करण्यात आला.
या सोहळ्यास आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू केदार जाधव, चिंचवडचे आमदार शंकर जगताप तसेच स्पर्धेचे प्रमुख आधारस्तंभ गोसेवक विजयशेठ जगताप यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
संपूर्ण स्पर्धेत आपल्या अष्टपैलू खेळाने छाप पाडणाऱ्या टीम डीपीएसच्या दिग्विजय घंटे याने भव्य ट्रॉफीसह रॉयल एनफिल्ड बुलेट जिंकत “महामानकरी” हा किताब पटकावला. उत्कृष्ट नियोजन, शिस्तबद्ध सामने आणि खेळाडूंच्या जिद्दीमुळे गेल्या ११ वर्षांपासून ही स्पर्धा क्रीडाप्रेमींच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.

सांगवी–दापोडी–पिंपळे गुरव प्रीमियर लीग गट
या गटात शुभम दादा स्पोर्ट्स फाउंडेशन (नवी सांगवी) संघाने दमदार खेळ करत विजेतेपद पटकावले. एस.एस. जनरेटर्स (पिंपळे गुरव) द्वितीय, सहजयोग ग्रुप ११ (पिंपळे गुरव) तृतीय क्रमांकावर राहिले.
एम.एन.सी. पिंपळे गुरव व शिवाय वॉरियर्स यांनी अनुक्रमे चौथा व पाचवा क्रमांक मिळवला.
वैयक्तिक पुरस्कारांमध्ये हार्मिक चव्हाण उत्कृष्ट गोलंदाज, ओमकार काशीद उत्कृष्ट फलंदाज ठरले. शैलेंद्र उर्फ सनी कसबे याला मालिकावीर म्हणून बुलेट गाडी देण्यात आली.
पुणे टेनिस क्रिकेट नियामक मंडळ व ‘एक आमदार एक संघ’ गट
या गटात शिरूरच्या यशवंत भाऊ पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशनने विजेतेपद मिळवले. मोहोळच्या ज्ञानेश्वरी इलेव्हनने द्वितीय, तर हडपसरच्या मातोश्री ११ ने तृतीय क्रमांक पटकावला.
या गटात आसिफ शेख उत्कृष्ट गोलंदाज, पप्पू तोडकर उत्कृष्ट फलंदाज ठरले. मोहोळच्या प्रथमेश राठोडला मालिकावीर किताबासह बुलेट गाडी देऊन सन्मानित करण्यात आले.
पिंपरी-चिंचवड टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन गट
कासारवाडीच्या संडे ११ संघाने प्रथम क्रमांक मिळवला. नॉकआऊट ११ (रुपीनगर) द्वितीय, समीर रबर तृतीय आणि गेम स्विंगर चतुर्थ क्रमांकावर राहिले.
स्पर्धेच्या निमित्ताने केवळ क्रिकेटच नव्हे, तर शिस्त, संघभावना आणि जिद्दीचे उत्कृष्ट दर्शन घडले. सर्व विजेत्या संघ आणि खेळाडूंचे अभिनंदन करत पुढील वर्षी अधिक भव्य स्वरूपात स्पर्धा आयोजित करण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सारसबाग बंद निर्णयावर मिस फरहा चॅरिटेबल फाउंडेशनचा आक्षेप, प्रशासनाने फेरविचार करावा अशी मागणी

“सुरक्षेच्या कारणांचा आधार घेत विशिष्ट समाजाला लक्ष्य केल्याचा संशय” — डॉ. फरहा शेख यांचे निवेदन बोपोडी | प्रतिनिधी : दी. 27 मे 2026 बकरी ईदनंतर पारंपरिक...

खडकी छावणीतील हातगाडी परवाना धारकांना मुदतवाढ द्या, सारथी सोशल फाउंडेशनची मागणी

कागदपत्रे अपूर्ण राहिल्याने अनेक हातगाडी व्यावसायिक अडचणीत; खडकी छावणी परिषदेला निवेदन सादर खडकी | प्रतिनिधी : दी. 26 मे 2026           ...

पीसीएमसीचा अतिक्रमणधारकांना इशारा; १५ दिवसांत पदपथ मोकळे करा, अन्यथा कठोर कारवाई

नागरिकांच्या सुरक्षित व विनाअडथळा प्रवासासाठी महापालिकेची मोहीम तीव्र; क्षेत्रीय कार्यालयनिहाय कारवाईचा आढावा पिंपरी | प्रतिनिधी : दि. 26 मे 2026           ...

पुण्यात मुस्लिम समाजाची गाईला ‘राष्ट्रीय प्राणी’ घोषित करण्याची मागणी

सामाजिक सलोखा, शांतता आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पुणे | प्रतिनिधी : दि. 26 मे 2026               ...

पुणे शहर काँग्रेसच्या नवनिर्वाचित शहराध्यक्षांचा जनहित जागृती मंचतर्फे सत्कार

डॉ. विश्वजीत कदम यांना शॉल व संविधान पुस्तक भेट देत मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव बोपोडी | प्रतिनिधी : दि. 23 मे 2026         ...

error: Content is protected !!