Homeपुणेसारसबाग बंद निर्णयावर मिस फरहा चॅरिटेबल फाउंडेशनचा आक्षेप, प्रशासनाने फेरविचार करावा अशी...

सारसबाग बंद निर्णयावर मिस फरहा चॅरिटेबल फाउंडेशनचा आक्षेप, प्रशासनाने फेरविचार करावा अशी मागणी

सुरक्षेच्या कारणांचा आधार घेत विशिष्ट समाजाला लक्ष्य केल्याचा संशय” — डॉ. फरहा शेख यांचे निवेदन

बोपोडी | प्रतिनिधी : दी. 27 मे 2026
बकरी ईदनंतर पारंपरिक पद्धतीने साजऱ्या केल्या जाणाऱ्या “बासी ईद” निमित्त अनेक मुस्लिम कुटुंबे शहरातील बागा, उद्याने व पर्यटनस्थळांना भेट देत असतात. या पार्श्वभूमीवर पुण्यातील सारसबाग २८ व २९ मे २०२६ रोजी बंद ठेवण्याच्या निर्णयावर मिस फरहा चॅरिटेबल फाउंडेशनने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. फरहा अनवर हुसेन शेख तसेच सामाजिक कार्यकर्ते अनवर हुसेन शेख यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सारसबाग बंद ठेवण्यामागील कारणे प्रशासनाने स्पष्ट करावीत. सुरक्षेच्या कारणास्तव निर्णय घेतला असल्यास, त्याच कालावधीत शहरातील इतर बागांबाबत वेगळी भूमिका का घेतली जात आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
निवेदनानुसार, “बासी ईद” निमित्त सारसबागेला भेट देण्याची परंपरा अनेक वर्षांपासून सुरू असून, सार्वजनिक ठिकाणे सर्व नागरिकांसाठी समान हक्काने खुली असली पाहिजेत. सुरक्षेच्या कारणास्तव काही अडचणी असल्यास प्रशासनाने पोलीस बंदोबस्त व अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था वाढवावी; मात्र विशिष्ट समाजाच्या पारंपरिक कौटुंबिक भेटींवर अप्रत्यक्ष निर्बंध येतील असे निर्णय टाळावेत, अशी मागणी फाउंडेशनने केली आहे.
फाउंडेशनच्या वतीने पुणे महानगरपालिका प्रशासन, उद्यान विभाग तसेच संबंधित अधिकाऱ्यांना लेखी निवेदन देण्यात आले असून, निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी करण्यात आली आहे.
डॉ. फरहा शेख यांनी सांगितले की, “सार्वजनिक स्थळांबाबत घेतले जाणारे निर्णय सर्वसमावेशक आणि पारदर्शक असणे आवश्यक आहे. कोणत्याही समाजात गैरसमज किंवा भेदभावाची भावना निर्माण होणार नाही, याची प्रशासनाने काळजी घ्यावी.”
दरम्यान, प्रशासनाकडून यासंदर्भात अधिकृत भूमिका स्पष्ट होणे अपेक्षित असल्याचेही फाउंडेशनच्या वतीने नमूद करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

खडकी छावणीतील हातगाडी परवाना धारकांना मुदतवाढ द्या, सारथी सोशल फाउंडेशनची मागणी

कागदपत्रे अपूर्ण राहिल्याने अनेक हातगाडी व्यावसायिक अडचणीत; खडकी छावणी परिषदेला निवेदन सादर खडकी | प्रतिनिधी : दी. 26 मे 2026           ...

पीसीएमसीचा अतिक्रमणधारकांना इशारा; १५ दिवसांत पदपथ मोकळे करा, अन्यथा कठोर कारवाई

नागरिकांच्या सुरक्षित व विनाअडथळा प्रवासासाठी महापालिकेची मोहीम तीव्र; क्षेत्रीय कार्यालयनिहाय कारवाईचा आढावा पिंपरी | प्रतिनिधी : दि. 26 मे 2026           ...

पुण्यात मुस्लिम समाजाची गाईला ‘राष्ट्रीय प्राणी’ घोषित करण्याची मागणी

सामाजिक सलोखा, शांतता आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पुणे | प्रतिनिधी : दि. 26 मे 2026               ...

पुणे शहर काँग्रेसच्या नवनिर्वाचित शहराध्यक्षांचा जनहित जागृती मंचतर्फे सत्कार

डॉ. विश्वजीत कदम यांना शॉल व संविधान पुस्तक भेट देत मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव बोपोडी | प्रतिनिधी : दि. 23 मे 2026         ...

ड्रायव्हर पदावर नियुक्ती, पण आरोग्य अधीक्षकांचा पीए म्हणून काम? खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डात नियुक्ती प्रक्रियेवर...

माहिती अधिकारातून उघड झाली बाब; सचिन कौदरे यांची चौकशीची मागणी, पदभरती व प्रशासकीय प्रक्रियेवर नागरिकांमध्ये चर्चा खडकी | प्रतिनिधी : दि. 22 मे 2026   ...

error: Content is protected !!