कागदपत्रे अपूर्ण राहिल्याने अनेक हातगाडी व्यावसायिक अडचणीत; खडकी छावणी परिषदेला निवेदन सादर
खडकी | प्रतिनिधी : दी. 26 मे 2026 खडकी छावणी परिषद हद्दीतील हातगाडी परवाना धारकांना कागदपत्रे सादर करण्यासाठी देण्यात आलेली मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी सारथी सोशल फाउंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन सौरभ यांना निवेदन देण्यात आले.
संस्थेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, खडकी छावणी परिषदेकडून हातगाडी व्यावसायिकांना आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी 30 मे 2026 पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. मात्र अनेक व्यावसायिकांकडे अद्याप काही महत्त्वाची कागदपत्रे उपलब्ध नसून, त्यामध्ये रहिवासी दाखला, पोलिस व्हेरिफिकेशन तसेच डोमिसाईल प्रमाणपत्र यांचा समावेश आहे. ही कागदपत्रे शासकीय प्रक्रियेमुळे उशिरा मिळत असल्याने अनेक हातगाडी धारकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
तसेच काही व्यावसायिकांनी आवश्यक अर्ज भरून शुल्काची पावती जोडलेली असूनही त्यांची प्रक्रिया अपूर्ण राहिली असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व हातगाडी परवाना धारकांना न्याय मिळावा आणि त्यांचा व्यवसाय सुरळीत सुरू राहावा यासाठी मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी
सारथी सोशल फाउंडेशन चे साकिब शेख, गोपाळ वाघमारे, नईम शेख यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏






















