पुणे पीसीएमसी न्यूज 24:Live
खडकी / प्रतिनिधी : दिनांक ३ ऑक्टोबर बोपोडी येथील हॅरीस पुलाखाली भाऊ पाटील रोड कडून खडकी कडे येणाऱ्या हॅरीस पुलाखाली महापालिकेने नदीपात्रात कचरा टाकू नये याकरिता जाळीचे कुंपण घातले होते काही दिवसांपूर्वी येथील जाळी काही उपद्मवी लोकांनी तोडून टाकली होती व तेथून मोठ्या प्रमाणात कोंबडीचे पीस तसेच चिकन मटण च्या दुकानातील घाण याठिकाणी नदीपात्रात टाकत होते. त्यामुळे नदी प्रदूषणाची समस्या वाढली होती. याकडे वंदे मातरम संघटना खडकी विभागाने लक्ष घालून
महापालिकेला निवेदन देत जाळ्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली. त्यानंतर महापालिका प्रशासनाने तत्परता दाखवत जाळ्याची दुरुस्ती केली.
या कामामुळे आता नदीत थेट कचरा जाण्याचा धोका टळला असून प्रदूषण नियंत्रणासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

नदी स्वच्छतेबाबत वंदे मातरम संघटना प्रयत्न करत असताना महापालिकेने वेळेत पाऊल उचलल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
याठिकाणी कचरा किंवा इतर घाण टाकणाऱ्या विरोधात महापालिकेने दंडात्मक कारवाई करावी व चिकन मटण व कोंबडीचे पिस आढळल्यास परिसरातील दुकान मालकांना समज द्यावी अशी मागणी ही वंदे मातरम सनघटनेने केली आहे.

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏






















