Homeखडकीखडकीतील संविधान चौक पुन्हा नामफलक लावण्याची व तिरंगा ध्वज स्थापन करण्याची दलित...

खडकीतील संविधान चौक पुन्हा नामफलक लावण्याची व तिरंगा ध्वज स्थापन करण्याची दलित पँथर ची मागणी

पुणे पीसीएमसी न्यूज 24:Live

खडकी / प्रतिनिधी : दिनांक ३ ऑक्टोबर
मुंबई-पुणे महामार्गावरील ऑल सेट्स शाळा चौकाला काही वर्षांपूर्वी संविधान चौक असे नामकरण करण्यात आले होते. त्यावेळी चौकात मोठ्या प्रमाणावर फलक उभारून नागरिकांना याची माहिती देण्यात आली होती. परंतु काही काळापूर्वी रस्ता रुंदीकरणाचे काम हाती घेतले गेले. या कामामध्ये चौकातील संविधान चौकाचा फलक काढण्यात आला. मात्र आता रस्ता रुंदीकरणाचे काम पूर्ण झाले असूनही तो फलक अद्याप चौकात बसविण्यात आलेला नाही.
ही बाब नागरिकांच्या लक्षात आल्याने चौकाचे महत्त्व पुन्हा अधोरेखित करण्यासाठी व इतिहास जतन करण्यासाठी दलित पँथर संघटनेच्या वतीने संविधान चौकाचा फलक तातडीने पुन्हा उभारण्यात यावा अशी मागणी होत आहे.

खडकी चा इतिहास व महत्व
 खडकी परिसर हा लष्करी दृष्टीने तसेच ऐतिहासिक वारशामुळे विशेष महत्त्वाचा आहे. स्वातंत्र्य संग्रामापासून भारतीय लष्कराच्या स्थापनेपर्यंत खडकीने देशाला अनेक योगदान दिले आहे. पुण्यातील हा परिसर केवळ लष्करी छावणी म्हणूनच नव्हे तर देशभक्तीचे प्रतीक म्हणूनही ओळखला जातो. त्यामुळे खडकीतील संविधान चौकाला ऐतिहासिक व राष्ट्रीय ओळख प्राप्त आहे.
उंच व भव्य तिरंगा ध्वजाची मागणी
फक्त फलक पुनर्स्थापित करण्यावरच नव्हे तर या चौकात देशभक्तीचे प्रतीक म्हणून भारत देशाचा उंच व महाकाय तिरंगा ध्वज उभारण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तिरंगा ध्वजामुळे चौकाचे महत्त्व वाढेल तसेच नागरिकांमध्ये राष्ट्रप्रेमाची जाणीव सतत ताजी राहील, असा मुद्दा सामाजिक कार्यकर्त्यांनी मांडला.
जनता दरबारात मांडलेली मागणी
ही मागणी छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या ‘जनता दरबार’मध्ये खडकीतील सामाजिक कार्यकर्ते अभिजित गडांकुश, विशाल ओव्हाळ, सुभाष पाडाळे, राहुल अवचिते यांनी केली. संविधान चौकाची ओळख पुन्हा दृढ व्हावी व राष्ट्रीय ध्वजामुळे चौकात भव्यतेची भर पडावी, यासाठी त्यांनी आमदार शिरोळे यांना निवेदन सादर केले.
आता या मागणीवर शासन व स्थानिक प्रशासन कोणती पावले उचलते याकडे खडकीकरांचे लक्ष लागले आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!