पुणे पीसीएमसी न्यूज 24:Live
! दुःखद वार्ता !
खडकी बाजार : येथील प्रभाकर देवराम कांबळे यांचे अल्पशा आजाराने ( शनिवार ता. ३० ऑगस्ट ) निधन झाले. ते खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड येथे आरोग्य निरीक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले होते. त्यांचा शांत मनमिळाऊ स्वभाव तसेच कोणालाही मदत करण्याची वृत्ती यामुळे ते खडकी परिसरात सर्वांच्या च जवळ होते.
माजी न्यायाधीश चंद्रकांत कांबळे यांचे ते मोठे बंधू होत. तसेच गणेश कांबळे पत्रकार ( न्यू महाराष्ट्र वेब पोर्टल ) यांचे ही ते मोठे बंधू होते . संपूर्ण परिवार कांबळे कुटुंबियांचे खडकीत सर्वांशी सलोख्याचे संबंध असल्यामुळे त्यांच्या निधनाने खडकीत सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. कांबळे यांच्या मागे भाऊ, मुले , मुली, सुना नातवंड असा मोठा परिवार आहे.
पुणे पीसीएमसी न्यूज 24:Live संपादक हरीश शर्मा हितचिंक मित्र परिवार तर्फे स्व.प्रभाकर कांबळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏






















