Homeपुणेप्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय व समाज सेवा प्रभाग तर्फे रक्तदान शिबिरात...

प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय व समाज सेवा प्रभाग तर्फे रक्तदान शिबिरात ६७ रक्तदात्यांचे रक्तदान

पुणे पीसीएमसी न्यूज 24:Live

खडकी / प्रतिनिधी : राजयोगिनी डॉ. दादी प्रकाशमणीजींच्या १८ वया पुण्यतिथी निमित्त  बोपोडी येथील  ब्राह्मकुमारी शिवशक्ती भवन  येथे प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय व समाज सेवा प्रभाग तर्फे  विश्व बंधुत्व दिनानिमित्त घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये ६७ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

भारत व नेपाळ येथे २२ ते २५ ऑगस्ट दरम्यान भव्य रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. या मोहिमेत एक लाख युनिटपेक्षा अधिक रक्तदान करण्याचा संकल्प करण्यात आला आहे, ज्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये होणार आहे.
बोपोडी येथील कार्यक्रमाची सुरुवात परमात्मानुभूती योग व मौनाने झाली. या प्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रा. सुरेश गोसावी, पुणे महापालिकेच्या उपमहापौर सुनिता वाडेकर, अण्णासाहेब मगर महाविद्यालयाचे प्राचार्य नितीन घोरपडे, ऍड. एस. के. जैन, कोहिनूर ग्रुपचे चेअरमन कृष्णकुमार गोयल, पुणे महापालिकेचे माजी नगरसेवक सनी निम्हण, माजी शिक्षण मंडळ सदस्य अमित मुरकुटे, वनवर्धिनी फाउंडेशनचे अध्यक्ष विजय ढोणे  उपस्थित होते. सर्वप्रथम दादीजींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली त्यानंतर रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या शिबिरात ६७ जणांनी रक्तदान करून आपला सहभाग नोंदविला. तसेच ब्रह्माकुमारी बोपोडीच्या वतीने टिंगरेनगर येथे  अनिल अग्रवाल यांच्या  जिम मध्ये हि रक्तदान शिबिर झाले, ज्यामध्ये २२ जणांनी  रक्तदान केले. या दोन्ही शिबिरांमध्ये औंध जिल्हा रुग्णालयाच्या तज्ज्ञ वैद्यकीय पथकाने रक्त संकलन केले.
बी. के. लक्ष्मी दीदींनी राजयोगिनी प्रकाशमणी दादीजींच्या सेवामय जीवनाचा उल्लेख करताना सांगितले की, दादीजींनी नेहमीच विश्वशांती, प्रेम आणि सहयोग यांचा संदेश दिला. त्या एक कुशल नेत्या होत्या व त्यांच्या नेतृत्वाखाली संस्थेने देश-विदेशात ईश्वरीय सेवांचा विस्तार साधला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!