पुणे पीसीएमसी न्यूज 24: पुणे / प्रतिनिधी
पुणे : ओला उबेर रॅपिडो या बेकायदेशीर पद्धतीने सुरू असलेल्या कंपन्यां विरोधात पुणे , मुंबई, नाशिक नागपूर येथील रिक्षा आणि कॅब चालक पंधरा ऑगस्ट ला सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत कॅब रिक्षा चालवणार नाही व आरटीओ कार्यालयासमोर तिरंगा धवज फडकवणार असून एक दिवस सामूहिक सुट्टी घेऊन ” ड्रायव्हव एकता दिवस , नो व्हेइकल डे ” म्हणून साजरा करणार आहे. अशी माहिती महाराष्ट्र कामगार सभेचे अध्यक्ष डॉ. केशव नाना क्षीरसागर यांनी दिली आहे.
ओला उबेर रॅपिडो या कंपन्या बेकायदेशीर पणे महाराष्टात चालू आहे यांना कोणताही परवाना नसून आपल्या मनमानी पाहिजे तसे रेट ठरवून या कंपन्या चालकांची आणि प्रवाश्यांची फसवणूक करीत आहे.याविरोधात रिक्षा कॅब संघटने तर्फे डॉ. केशव क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे मात्र हे आंदोलन धुडकावून लावण्याचा प्रयत्न होत आहे. ओला उबेर यासारख्या कंपन्या चालक व प्रवासी दोघांची ही फसवणूक करीत आहे.

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏



















