पुणे पीसीएमसी न्यूज 24: पुणे / हडपसर
पुणे / हडपसर :
येथील साडेसतरा नळी येथे काही गुंडांनी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास दोन दुचाकीवर हातात कोयते, तलवारी, लोखंडी रॉड घेऊन टोळक्यांनी नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. हवेत कोयता , तलवारी फिरवत दुकानांच्या शटरवर, वाहनांवर वार करत तोडफोड केली आणि परिसरात भीतीचं वातावरण निर्माण केली, हडपसर पोलिसांनी या फरार आरोपींना अहिल्यानगर परिसरातून जेरबंद केले, व ज्याठिकाणी गुन्हा केला त्याच ठिकाणी त्यांची धिंड काढून मस्ती जिरवली. ” जेथे दहशत गुन्हा तेथेच धिंड पुणे पोलिसांचा हा नवा पॅटर्न” राज्यभर चर्चेत आला आहे.
या घटनेनंतर हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा कलम ७४१/२०२५. कलम १४३, १४७, १४८, १४९, ३०७, ३२७, ३४, शस्त्र कायदा कलम ४, २५, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(३), १३५) अंतर्गत नोंदवून तपासाला सुरुवात केली. गुन्हा घडला त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, स्थानिक माहिती आणि गुप्त बातमीदारांच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथके तयार करण्यात आली. दुसऱ्याच दिवशी म्हणजे ०६ ऑगस्ट रोजी २४ तासांच्या आत हडपसर पोलीस पथकाने कारवाई करत सहा आरोपींना ताब्यात घेतले. श्रेयस विकास आलेकर (वय २२, रा.हडपसर, पुणे) रोहित संदीप खाडे (वय १९, रा. गोकुळ नगर , कात्रज, पुणे) चार अल्पवयीन बालक यांचा समावेश आहे
या घटनेतील आरोपींनी गुन्हा केल्यानंतर तातडीने फरार होण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पोलीस उपआयुक्त डॉ.राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांच्या नेतृत्वाखाली विविध पथकांनी सीसीटीव्ही, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने कारवाई राबवली.
अहिल्यानगर परिसरातून आरोपींना हडपसर पोलिसांनी मोठ्या शिताफीने पकडले सध्या गुन्हेगारांना जेरबंद करून त्यांची धिंड काढणे, हा पोलिसांचा नवा पॅटर्न राज्यभर चर्चेत आहे. याच प्रकारे या गुन्हेगारांना ज्या ठिकाणी त्यांनी दहशत माजवली होती, त्या साडेसतरानळी चौकातच त्यांची धिंड काढण्यात आली.
या कारवाईमुळे नागरिकांमध्ये दिलासा आणि पोलिसांबद्दल विश्वास वाढला आहे. डॉ. अमितेश कुमार – पोलीस आयुक्त, पुणे शहर
रंजन कुमार शर्मा – सह पोलीस आयुक्त, पुणे
मनोज पाटील – अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), पुणे डॉ.राजकुमार शिंदे – पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५
संजय मोगले – वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हडपसर यांच्या मार्गदर्शनाखाली,
निलेश जगदाळे गुन्हे पोलीस निरीक्षक, अश्विनी जगताप पोलीस निरीक्षक गुन्हे,
पोलीस उप निरीक्षक – हसन मुलानी, सत्यवान गेंड, अंमलदार अविनाश गोसावी,
कर्मचारी – संदीप राठोड, दीपक कांबळे, सचिन जाधव, अमित साखरे, निखिल पवार, निलेश किरवे बापू लोणकर अमोल दनके, भगवान हंबर्डे, अजित मदने, अभिजीत राऊत, तुकाराम झुंजार, महेश चव्हाण, कुंडलिक केसकर, चंद्रकांत रेजितवाड, रविकांत कचरे, महावीर लोंढे, नामदेव मारडकर, ज्ञानेश्वर चोरमले, माधव हिरवे,
आदींनी ही धडक कारवाई केली. क्रांती शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अमोल नाना यशवंत तुपे यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना तातडीने निवेदन देऊन कडक कारवाई करण्याची मागणी केली.
हडपसरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथके आरोपींच्या शोधात रवाना झाली अहिल्यानगर येथून सहा आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. जेथे आरोपींनी तोडफोड करून दहशत केली होती तेथेच या आरोपींची पोलिसांनी धिंड काढून नागरिकांना दिलासा दिला यावेळी शेकडो नागरिक उपस्थित होते. हडपसर परिसरात वाढत्या कोयता गँगच्या गुन्हेगारीला रोखण्यासाठी पोलिसांनी वेळेत दाखवलेली तत्परता आणि दृढ निश्चय प्रशंसनीय आहे. अशा पद्धतीने कडक आणि तातडीची कारवाई झाली तर गुन्हेगारी रोखली जाऊ शकते, असा विश्वास क्रांती शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अमोल नाना यशवंत तुपे यांनी व्यक्त केला.

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏






















