सोसायट्यांच्या मधोमध असलेल्या उद्यानात सुरक्षेचा अभाव; महिलां-विद्यार्थ्यांना ये-जा करताना भीती
भवानी पेठ | प्रतिनिधी : दि.२२ एप्रिल २०२६ सेव्हन लव्हस चौक उड्डाणपुलाखाली, मीरा सोसायटी समोरील ‘राजमाता जिजाऊ उद्यान’ सध्या पूर्णपणे दुर्लक्षित अवस्थेत असून येथे भर दिवसा गंजेडी आणि दारुड्यांचा वावर वाढला आहे. उघड्यावर दारू पिण्याचे प्रकार सर्रास घडत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निवासी सोसायट्या असून महिला, विद्यार्थी व नागरिकांची सतत ये-जा असते. मात्र उद्यानातील बेकायदेशीर वावरामुळे त्यांना असुरक्षित वाटत असल्याची प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सार्वजनिक ठिकाणाचा ‘अड्डा’ बनल्याचा आरोपही नागरिकांकडून करण्यात येत आहे.

सदर उद्यान २०१७ साली भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका अर्चना तुषार पाटील यांनी महापालिकेमार्फत विकसित केले होते. २०१७ ते २०२२ या त्यांच्या कार्यकाळात उद्यान सुस्थितीत व आकर्षक होते. मात्र २०२२ नंतर महापालिकेच्या निवडणुका न झाल्याने देखभालीकडे दुर्लक्ष झाले आणि उद्यानाची दुरवस्था झाली.
दरम्यान, २०२६ मध्ये पुन्हा याच प्रभागातून निवडून आलेल्या विद्यमान नगरसेविका अर्चना तुषार पाटील यांनी उद्यानाच्या दुरवस्थेची दखल घेत लवकरच सुधारणा करण्याचे आश्वासन दिले आहे.
“मी २०१७ ते २०२२ या काळात नगरसेविका असताना उड्डाणपुलाखाली दोन्ही बाजूंना उद्यान तयार करून त्याचे सुशोभीकरण केले होते. माझ्या कार्यकाळात नियमित देखभाल केली जात होती. मात्र २०२२ ते २०२५ दरम्यान उद्यानाची दुरवस्था झाली. सध्या ठेकेदार व निधीअभावी काम थांबले होते, पण आता महिन्याभरातच पुन्हा सुशोभीकरणाला सुरुवात केली जाईल. तसेच या ठिकाणी पोलिसांची गस्तही वाढवण्यात येईल,”
— अर्चना तुषार पाटील, नगरसेविका, पुणे महापालिका

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏






















