Homeपुणेपाटील इस्टेट–संचेती हॉस्पिटलकडे जाणारा बंद रस्ता सुरू करण्याची मागणी; राष्ट्रवादी शरद पवार...

पाटील इस्टेट–संचेती हॉस्पिटलकडे जाणारा बंद रस्ता सुरू करण्याची मागणी; राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे निवेदन

महत्त्वाचा मार्ग ठप्प; स्थानिकांना वळसा, रस्ता तात्काळ सुरू करा – राष्ट्रवादीची मागणी

शिवाजीनगर | प्रतिनिधी : २२ एप्रिल २०२६                पाटील इस्टेट परिसरातून संचेती हॉस्पिटलकडे जाणारा महत्त्वाचा रस्ता गेल्या काही दिवसांपासून बंद करण्यात आल्याचे समोर आले आहे. या निर्णयामुळे पाटील इस्टेट तसेच महात्मा गांधी वसाहतीतील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

Oplus_131072

सदर रस्ता हा स्थानिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा दुवा असून, याच मार्गामुळे या भागातील वस्ती शहराच्या मध्यवर्ती भागाशी जोडली जाते. रस्ता बंद किंवा एकेरी केल्यास नागरिकांना लांबचा वळसा घालून प्रवास करावा लागत असून, त्यामुळे वेळ आणि इंधनाचा अतिरिक्त खर्च होत आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीतही अडचणी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) तर्फे संबंधित प्रशासनाकडे निवेदन देण्यात आले. अॅड. स्वप्निल मारुती जोशी (कार्यकारिणी सदस्य, पुणे बार असोसिएशन व अध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस – छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ) यांनी वाहतूक विभागाचे पोलीस सहाय्यक निरीक्षक श्री. प्रमोद दोरकर यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
यावेळी नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन सदर रस्ता तात्काळ पूर्ववत सुरू करण्याची मागणी करण्यात आली. संबंधित अधिकाऱ्यांनीही या विषयाची दखल घेत लवकरात लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्याची माहिती देण्यात आली आहे.
स्थानिक नागरिकांनीही प्रशासनाने त्वरित निर्णय घेऊन रस्ता सुरू करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!