पुणे पीसीएमसी न्यूज 24:Live
नाशिक / प्रतिनिधी : गेल्या महिन्याभरापासून वडनेर दुमाला वडनेर गेट परिसरात अनेक ठिकाणी रात्री अपरात्री दिवसाढवळ्या बिबट्याने धुमाकूळ घातला होता तसेच वडनेर येथील रेंज रोड येथील कु.आयुष भगत या ३ वर्षाच्या बालकावर बिबट्याने हल्ला करून जखमी केले होते अखेर ते बालक मरण पावले. त्यामुळे या भागातील नागरिक सतत भीतीच्या सावटाखाली रहात होते.
यासाठी येथील स्थानिक माजी नगरसेवक केशव पोरजे यांनी नागरिकांच्या मदतीने वनविभागावर धडक मोर्चा नेला होता. गावकऱ्यांच्या जीवावर आलेल्या संकटाला थोपवण्यासाठी उभारलेला मोर्चा हा फक्त आंदोलन नव्हता,तर हा जनतेच्या जगण्याचा प्रश्न होता.सलग दबाव,आक्रोश आणि ठाम मागणी यामुळे अखेर वनविभागाला पावले उचलावी लागली.
नागरिकांच्या एकतेचा विजय म्हणून वनविभागामार्फत बिबट्याला जेरबंद करण्यात आले आणि गावकऱ्यांच्या मनातील भीतीचे सावट दूर झाले.
वनविभागाने ७ दिवसाच्या आत बिबट्याला पकडण्याचे आश्वासन दिले होते यंत्रणा कामाला लावली २ दिवसात बिबट्या पकडला. आता बाकीचे बिबटे लवकरात लवकर पकडावे असे आव्हान वनविभागाला करण्यात आले आहे.

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏

















