Homeपिंपरी चिंचवडभारतीय जनता पार्टी मुळशी तालुका उपाध्यक्षपदी रवी बोडके यांची नियुक्ती; भाजप संघटन...

भारतीय जनता पार्टी मुळशी तालुका उपाध्यक्षपदी रवी बोडके यांची नियुक्ती; भाजप संघटन अधिक मजबूत

हरीश शर्मा | मुख्य संपादक ९८२२२२००९०          भारतीय जनता पार्टीच्या मुळशी तालुका उपाध्यक्षपदी रवी बळीराम बोडके यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. माण येथे पार पडलेल्या पक्षाच्या अधिकृत कार्यकमात माजी आमदार शरद ढमाले, संग्राम थोपटे, तालुका अध्यक्ष हनुमंत चव्हाण तसेच जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या प्रा. भारतीताई विनोदे यांच्या हस्ते बोडके यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

रवी बोडके हे आयटीनगरी माणचे भूमिपुत्र असून ते माण ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच तसेच विद्यमान सदस्य आहेत. गेल्या पंधरा वर्षांहून अधिक काळ ते माण गावच्या स्थानिक राजकारणात सक्रिय असून, माण सह हिंजवडी आयटी पार्क परिसर, घोटावडे, रिहे खोरे, पौड व कोळवण खोऱ्यात त्यांचा मजबूत जनसंपर्क आहे.

Oplus_131072

पक्षाची आगामी वाटचाल, तालुक्यातील संघटन बांधणी आणि ग्रामीण–शहरी समन्वय अधिक भक्कम करण्याच्या दृष्टीने भाजपने रवी बोडके यांची मुळशी तालुका उपाध्यक्षपदी निवड केल्याचे बोलले जात आहे. पंचायत समितीचे सभापती पांडुरंग ओझरकर यांचे अत्यंत विश्वासू म्हणून त्यांची तालुक्यात ओळख असून, त्यांच्यावर मुळशी तालुका ग्रामीण मंडल कार्यकारिणीमध्ये तालुका उपाध्यक्ष (मुळशी पूर्व) पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
या प्रसंगी माजी तालुका अध्यक्ष विनायक ठोंबरे, तालुका पश्चिम अध्यक्ष समीर मारणे, जिल्हा पदाधिकारी जीवन साखरे, उत्पन्न बाजार समिती संचालक पांडुरंग राक्षे,  युवा मोर्चाचे संदीप साठे, माजी उपसरपंच प्रदीप पारखी, प्रदीप साखरे, हिंजवडीचे माजी सरपंच विक्रम साखरे, शिवनाथ जांभुळकर, निलेश भोईर यांच्यासह जिल्हा परिषद गट व गणातील इच्छुक उमेदवार आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची ध्येय-धोरणे तळागाळात पोहोचवून मुळशी तालुक्यात भाजपची ताकद अधिक मजबूत करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे मनोगत नवनियुक्त तालुका उपाध्यक्ष रवी बोडके यांनी व्यक्त केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सारसबाग बंद निर्णयावर मिस फरहा चॅरिटेबल फाउंडेशनचा आक्षेप, प्रशासनाने फेरविचार करावा अशी मागणी

“सुरक्षेच्या कारणांचा आधार घेत विशिष्ट समाजाला लक्ष्य केल्याचा संशय” — डॉ. फरहा शेख यांचे निवेदन बोपोडी | प्रतिनिधी : दी. 27 मे 2026 बकरी ईदनंतर पारंपरिक...

खडकी छावणीतील हातगाडी परवाना धारकांना मुदतवाढ द्या, सारथी सोशल फाउंडेशनची मागणी

कागदपत्रे अपूर्ण राहिल्याने अनेक हातगाडी व्यावसायिक अडचणीत; खडकी छावणी परिषदेला निवेदन सादर खडकी | प्रतिनिधी : दी. 26 मे 2026           ...

पीसीएमसीचा अतिक्रमणधारकांना इशारा; १५ दिवसांत पदपथ मोकळे करा, अन्यथा कठोर कारवाई

नागरिकांच्या सुरक्षित व विनाअडथळा प्रवासासाठी महापालिकेची मोहीम तीव्र; क्षेत्रीय कार्यालयनिहाय कारवाईचा आढावा पिंपरी | प्रतिनिधी : दि. 26 मे 2026           ...

पुण्यात मुस्लिम समाजाची गाईला ‘राष्ट्रीय प्राणी’ घोषित करण्याची मागणी

सामाजिक सलोखा, शांतता आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पुणे | प्रतिनिधी : दि. 26 मे 2026               ...

पुणे शहर काँग्रेसच्या नवनिर्वाचित शहराध्यक्षांचा जनहित जागृती मंचतर्फे सत्कार

डॉ. विश्वजीत कदम यांना शॉल व संविधान पुस्तक भेट देत मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव बोपोडी | प्रतिनिधी : दि. 23 मे 2026         ...

error: Content is protected !!