Homeपिंपरी चिंचवडपुण्यात निवडणूक आचारसंहितेचा भंग? महापालिका निवडणूक हद्दीत मुख्यमंत्र्यांचे पोस्टर झाकण्याची मागणी

पुण्यात निवडणूक आचारसंहितेचा भंग? महापालिका निवडणूक हद्दीत मुख्यमंत्र्यांचे पोस्टर झाकण्याची मागणी

पुणे |प्रतिनिधी : दि. ९ जानेवारी २०२६
महानगरपालिका निवडणूक जाहीर झाल्यानंतर लागू झालेल्या आदर्श आचारसंहितेचे पालन होत नसल्याचा गंभीर आरोप करत महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुण्यातील खडकी कॅन्टोन्मेंट विभाग समन्वयक तथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे पदाधिकारी मदन गाडे यांनी ही तक्रार केली आहे.

तक्रारीनुसार, निवडणूक जाहीर झाल्यानंतर संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था व प्रशासनाने राजकीय नेते, लोकप्रतिनिधी यांचे होर्डिंग, पोस्टर व नामफलक झाकणे अथवा काढून टाकणे बंधनकारक असते. मात्र पुणे शहरात अनेक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोस्टरवर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो असलेले पोस्टर अद्यापही महापालिका निवडणूक हद्दीत उघडेच असल्याचे निदर्शनास आले आहे.
यामुळे आदर्श आचारसंहितेचा स्पष्ट भंग होत असून, याबाबत तात्काळ कारवाई करण्याची मागणी मदन गाडे यांनी केली आहे. संबंधित पोस्टरवरील मुख्यमंत्र्यांचे फोटो तात्काळ झाकावेत तसेच संबंधित विभागांना स्पष्ट निर्देश द्यावेत, अशी विनंती त्यांनी मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्याकडे केली आहे.
दरम्यान, या तक्रारीमुळे पुण्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता असून, निवडणूक आयोग आणि प्रशासन याबाबत काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!