पुणे | प्रतिनिधी : दि. 8 मे 2026
बहुजन भीमसेना पक्षाच्या वतीने पुणे जिल्हा, पुणे शहर तसेच पिंपरी-चिंचवड शहरातील कार्यकारिणीमध्ये मोठा फेरबदल करण्यात येणार असल्याची घोषणा पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सहसचिव नारायण लोखंडे यांनी केली आहे.
पक्षाच्या आगामी संघटनात्मक बांधणीसाठी पुणे जिल्हा, पुणे शहर आणि विविध विधानसभा मतदारसंघांतील पदाधिकाऱ्यांची निवड लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती बहुजन भीमसेना संस्थापक अध्यक्ष मोहन भगववत म्हस्के यांनी प्रसिद्धीस दिली आहे. यामध्ये युवक व युवतींना विशेष प्राधान्य दिले जाणार असून नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
सध्याची कार्यकारिणी फेरबदल करून पक्ष अधिक मजबूत करण्याचा निर्णय घेण्यात आला असून नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडीची जबाबदारी नारायण लोखंडे यांनी स्वीकारली आहे.
पक्षात काम करण्याची इच्छा असलेल्या युवक-युवतींनी संपर्क साधण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏






















