Homeपुणेकामगार आयुक्त कार्यालयाजवळ झेब्रा क्रॉसिंगची मागणी; मनसेचे महापालिका आयुक्तांना निवेदन

कामगार आयुक्त कार्यालयाजवळ झेब्रा क्रॉसिंगची मागणी; मनसेचे महापालिका आयुक्तांना निवेदन

शिवाजीनगर | प्रतिनिध : दि. 8 मे 2026
जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील कामगार आयुक्त कार्यालयासमोरील धोकादायक वाहतुकीमुळे पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला असून, त्या ठिकाणी तातडीने झेब्रा क्रॉसिंग पट्टे मारावेत, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पुणे महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे.

कामगार आयुक्त कार्यालय परिसरात अनेक आयटी कंपन्या असून मोठ्या प्रमाणावर कर्मचारी, महिला, विद्यार्थी आणि नागरिकांची ये-जा सुरू असते. शिवाजीनगर रेल्वे स्थानकातून येणारे अनेक कर्मचारी व विद्यार्थी रस्ता ओलांडून समोरील कंपन्या तसेच बसथांब्याकडे जात असतात. मात्र, पुणे स्टेशनकडून वाकडेवाडीच्या दिशेने जाणाऱ्या पुलावरून वाहने अतिवेगाने येत असल्याने पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागत आहे.
या ठिकाणी यापूर्वीही अनेक छोटे-मोठे अपघात घडल्याचा दावा मनसेने केला असून, नागरिकांकडून सातत्याने तक्रारी येत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
तसेच, येत्या आठ दिवसांत संबंधित ठिकाणी झेब्रा क्रॉसिंग न केल्यास मनसे स्टाईल आंदोलन छेडण्यात येईल आणि भविष्यात कोणताही अपघात झाल्यास प्रशासनालाच जबाबदार धरले जाईल, असा इशारा  मनसेचे शहर उपाध्यक्ष सुहास भगवानराव निम्हण यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा उपाध्यक्ष (वाहतूक सेना) अँथोनी आठव, उपविभागाध्यक्ष गोकुळ अडागळे तसेच शाखाध्यक्ष मिलन भोरडे यांनी दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सारसबाग बंद निर्णयावर मिस फरहा चॅरिटेबल फाउंडेशनचा आक्षेप, प्रशासनाने फेरविचार करावा अशी मागणी

“सुरक्षेच्या कारणांचा आधार घेत विशिष्ट समाजाला लक्ष्य केल्याचा संशय” — डॉ. फरहा शेख यांचे निवेदन बोपोडी | प्रतिनिधी : दी. 27 मे 2026 बकरी ईदनंतर पारंपरिक...

खडकी छावणीतील हातगाडी परवाना धारकांना मुदतवाढ द्या, सारथी सोशल फाउंडेशनची मागणी

कागदपत्रे अपूर्ण राहिल्याने अनेक हातगाडी व्यावसायिक अडचणीत; खडकी छावणी परिषदेला निवेदन सादर खडकी | प्रतिनिधी : दी. 26 मे 2026           ...

पीसीएमसीचा अतिक्रमणधारकांना इशारा; १५ दिवसांत पदपथ मोकळे करा, अन्यथा कठोर कारवाई

नागरिकांच्या सुरक्षित व विनाअडथळा प्रवासासाठी महापालिकेची मोहीम तीव्र; क्षेत्रीय कार्यालयनिहाय कारवाईचा आढावा पिंपरी | प्रतिनिधी : दि. 26 मे 2026           ...

पुण्यात मुस्लिम समाजाची गाईला ‘राष्ट्रीय प्राणी’ घोषित करण्याची मागणी

सामाजिक सलोखा, शांतता आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पुणे | प्रतिनिधी : दि. 26 मे 2026               ...

पुणे शहर काँग्रेसच्या नवनिर्वाचित शहराध्यक्षांचा जनहित जागृती मंचतर्फे सत्कार

डॉ. विश्वजीत कदम यांना शॉल व संविधान पुस्तक भेट देत मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव बोपोडी | प्रतिनिधी : दि. 23 मे 2026         ...

error: Content is protected !!