पुणे पीसीएमसी न्यूज: 24 पुणे / प्रतिनिधी
कोणतीही परवानगी न घेता डायरेक्ट महापालिकेच्या सभागृहात प्रवेश करून सुरक्षा रक्षकांना न जुमानता पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम आणि अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज .पी. यांना ‘तुम्हाला महाराष्ट्रात राहू देणार नाही’ असे म्हणून शासकीय कामात अडथळा आणला. तसेच सभागृहातून बाहेर आल्यानंतर काही जणांनी पालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर चढून आत प्रवेश केला आणि आयुक्तांच्या विरुद्ध घोषणा दिल्या ”
याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी किशोर शिंदे, नरेंद्र तांबोळी, अविनाश जाधव,महेश लाड , प्रशांत मते व इतरांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अमोल शिवाजी पवार ,वय 35 यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏






















