Homeपुणे“पल पल दिलके पास…” च्या सुरांतून समाजकार्याला हातभार

“पल पल दिलके पास…” च्या सुरांतून समाजकार्याला हातभार

पालवी नर्चरिंग माईंड्स अँड बियॉन्डच्या निधी उभारणी कार्यक्रमाला पुणेकरांची उत्स्फूर्त दाद

पुणे | प्रतिनिधी : दि. 6 फेब्रुवारी 2026                   एप्रिल 2025 मध्ये स्थापन झालेल्या पालवी नर्चरिंग माईंड्स अँड बियॉन्ड या सामाजिक संस्थेच्या कार्यासाठी निधी उभारण्याच्या उद्देशाने एक अविस्मरणीय सांस्कृतिक कार्यक्रम पुण्यात पार पडला.  अतुल मिश्रा व त्यांच्या सहकाऱ्यांनी सुप्रसिद्ध सिनेकलावंत धर्मेंद्र यांच्या चित्रपटातील अजरामर गीतांवर आधारित “पल पल दिलके पास” हा संगीतमय कार्यक्रम विनामूल्य सादर करून समाजकार्याला मोलाची साथ दिली.

हा कार्यक्रम पुणे इंटरनॅशनल सेंटर, पाषाण येथील सभागृहात आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमास हजारो रसिकांची उपस्थिती लाभली असून, उपस्थित प्रेक्षकांनी कलाकारांच्या सादरीकरणाला उत्स्फूर्त टाळ्यांच्या गजरात दाद दिली. संपूर्ण सभागृह संगीतमय वातावरणाने भारावून गेले होते.
या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून आयसर संस्थेचे संचालक सुनील भागवत उपस्थित होते. त्यांनी संस्थेच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत अशा उपक्रमांची समाजाला नितांत गरज असल्याचे प्रतिपादन केले. तसेच  जितेंद्र दिवगी यांनी बिट्स पिलानी संस्थेच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने संस्थेस आर्थिक सहाय्य प्रदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
पालवी नर्चरिंग माईंड्स अँड बियॉन्ड या संस्थेच्या संस्थापक शोभा श्रीकांत, वर्षा काळे, सुधा भट आणि निपा जोग यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष मेहनत घेतली. नियोजनापासून अंमलबजावणीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर त्यांनी घेतलेली धडपड उल्लेखनीय ठरली.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक दानशूर नागरिकांनी संस्थेला उदार हस्ते आर्थिक मदत केली. या माध्यमातून उभारण्यात आलेल्या निधीचा उपयोग संस्थेतर्फे विविध समाजोपयोगी, शैक्षणिक व संवेदनशील उपक्रमांसाठी करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
संगीत, समाजकार्य आणि माणुसकी यांचा सुंदर संगम असलेला हा कार्यक्रम उपस्थितांच्या मनात दीर्घकाळ स्मरणात राहणारा ठरला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सारसबाग बंद निर्णयावर मिस फरहा चॅरिटेबल फाउंडेशनचा आक्षेप, प्रशासनाने फेरविचार करावा अशी मागणी

“सुरक्षेच्या कारणांचा आधार घेत विशिष्ट समाजाला लक्ष्य केल्याचा संशय” — डॉ. फरहा शेख यांचे निवेदन बोपोडी | प्रतिनिधी : दी. 27 मे 2026 बकरी ईदनंतर पारंपरिक...

खडकी छावणीतील हातगाडी परवाना धारकांना मुदतवाढ द्या, सारथी सोशल फाउंडेशनची मागणी

कागदपत्रे अपूर्ण राहिल्याने अनेक हातगाडी व्यावसायिक अडचणीत; खडकी छावणी परिषदेला निवेदन सादर खडकी | प्रतिनिधी : दी. 26 मे 2026           ...

पीसीएमसीचा अतिक्रमणधारकांना इशारा; १५ दिवसांत पदपथ मोकळे करा, अन्यथा कठोर कारवाई

नागरिकांच्या सुरक्षित व विनाअडथळा प्रवासासाठी महापालिकेची मोहीम तीव्र; क्षेत्रीय कार्यालयनिहाय कारवाईचा आढावा पिंपरी | प्रतिनिधी : दि. 26 मे 2026           ...

पुण्यात मुस्लिम समाजाची गाईला ‘राष्ट्रीय प्राणी’ घोषित करण्याची मागणी

सामाजिक सलोखा, शांतता आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पुणे | प्रतिनिधी : दि. 26 मे 2026               ...

पुणे शहर काँग्रेसच्या नवनिर्वाचित शहराध्यक्षांचा जनहित जागृती मंचतर्फे सत्कार

डॉ. विश्वजीत कदम यांना शॉल व संविधान पुस्तक भेट देत मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव बोपोडी | प्रतिनिधी : दि. 23 मे 2026         ...

error: Content is protected !!