Homeखडकीखडकीतील आपल्या इमारतींवर मोबाइल टॉवर लावलेल्या मालकांना कॅन्टोन्मेंट बोर्डातर्फे नोटीस देणे सुरू

खडकीतील आपल्या इमारतींवर मोबाइल टॉवर लावलेल्या मालकांना कॅन्टोन्मेंट बोर्डातर्फे नोटीस देणे सुरू

खडकी / प्रतिनिधी : दि. १६ डिसेंबर २०२५                खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत ज्या इमारतींवर मोबाइल टॉवर बसवण्यात आले आहेत, त्या सर्व इमारत मालकांना व संबंधित मोबाइल कंपन्यांना कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वतीने नोटीस बजावण्यात येत आहे. या नोटीसीद्वारे सात दिवसांच्या आत संबंधित इमारतीचे स्ट्रक्चर ऑडिट करून इमारत टॉवरचा भार झेपू शकते का याबाबतचे प्रमाणपत्र (सर्टिफिकेट) सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, मोबाइल कंपनीसोबत करण्यात आलेल्या कराराची प्रत देखील कॅन्टोन्मेंट बोर्डाकडे सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही नोटीसीत देण्यात आला आहे.

खडकी बाजार परिसरात मोठ्या प्रमाणावर जुन्या तसेच धोकादायक अवस्थेतील इमारती असून, अशा इमारतींवर मोबाइल टॉवर बसवण्यात आल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर खडकीतील सामाजिक कार्यकर्ते अभिजीत गडांकुश यांनी मोबाइल टॉवरच्या विरोधात खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालयासमोर उपोषण केले होते.
याबाबत माहिती देताना खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अतिक्रमण अधिकारी स्वप्नाली देशमुख यांनी सांगितले की, “खडकी बाजार व कॅन्टोन्मेंट हद्दीतील ज्या इमारतींवर मोबाइल टॉवर बसवण्यात आले आहेत, त्या सर्व इमारत मालकांकडून इमारतीचा स्ट्रक्चर ऑडिट रिपोर्ट व मोबाइल कंपनीसोबत झालेल्या कराराची प्रत नोटीसीद्वारे मागवण्यात येत आहे. तसेच संबंधित मोबाइल कंपन्यांनाही बोर्डाच्या वतीने नोटीस देण्यात येत आहे.”

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!