हरीश शर्मा | मुख्य संपादक ९८२२२२००९० भारतीय जनता पार्टीच्या मुळशी तालुका उपाध्यक्षपदी रवी बळीराम बोडके यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. माण येथे पार पडलेल्या पक्षाच्या अधिकृत कार्यकमात माजी आमदार शरद ढमाले, संग्राम थोपटे, तालुका अध्यक्ष हनुमंत चव्हाण तसेच जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या प्रा. भारतीताई विनोदे यांच्या हस्ते बोडके यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
रवी बोडके हे आयटीनगरी माणचे भूमिपुत्र असून ते माण ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच तसेच विद्यमान सदस्य आहेत. गेल्या पंधरा वर्षांहून अधिक काळ ते माण गावच्या स्थानिक राजकारणात सक्रिय असून, माण सह हिंजवडी आयटी पार्क परिसर, घोटावडे, रिहे खोरे, पौड व कोळवण खोऱ्यात त्यांचा मजबूत जनसंपर्क आहे.

पक्षाची आगामी वाटचाल, तालुक्यातील संघटन बांधणी आणि ग्रामीण–शहरी समन्वय अधिक भक्कम करण्याच्या दृष्टीने भाजपने रवी बोडके यांची मुळशी तालुका उपाध्यक्षपदी निवड केल्याचे बोलले जात आहे. पंचायत समितीचे सभापती पांडुरंग ओझरकर यांचे अत्यंत विश्वासू म्हणून त्यांची तालुक्यात ओळख असून, त्यांच्यावर मुळशी तालुका ग्रामीण मंडल कार्यकारिणीमध्ये तालुका उपाध्यक्ष (मुळशी पूर्व) पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
या प्रसंगी माजी तालुका अध्यक्ष विनायक ठोंबरे, तालुका पश्चिम अध्यक्ष समीर मारणे, जिल्हा पदाधिकारी जीवन साखरे, उत्पन्न बाजार समिती संचालक पांडुरंग राक्षे, युवा मोर्चाचे संदीप साठे, माजी उपसरपंच प्रदीप पारखी, प्रदीप साखरे, हिंजवडीचे माजी सरपंच विक्रम साखरे, शिवनाथ जांभुळकर, निलेश भोईर यांच्यासह जिल्हा परिषद गट व गणातील इच्छुक उमेदवार आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची ध्येय-धोरणे तळागाळात पोहोचवून मुळशी तालुक्यात भाजपची ताकद अधिक मजबूत करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे मनोगत नवनियुक्त तालुका उपाध्यक्ष रवी बोडके यांनी व्यक्त केले आहे.

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏






















