
पुणे पीसीएमसी न्यूज 24 : पुणे / प्रतिनिधी
पुणे : पुण्यातील मानाचा चौथा महागणपती म्हणून प्रसिद्ध असलेले श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट शतकोत्तर रौप्य महोत्सव वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदाना शिबिरात पुण्यातील विविध गणेश मंडळातील पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध ढोल ताशा पथकातील वादक मित्र असे तब्बल 561 युवकांनी रक्तदान केले .
हे शिबिर रविवार, दि. ३ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ९ ते सायं. ५ वाजेपर्यंत नु. म. वि. शाळा, बाजीराव रोड येथे आयोजित करण्यात आले होते . या रक्तदान शिबिरास कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने, भाजपा पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे सह मानाचा पहिला श्री कसबा गणपती चे अध्यक्ष श्री श्रीकांत शेटे आदी मान्यवरांनी भेट दिली . यावेळी रक्तदान करण्यास तरुणांसोबत
तरुणींचाही उत्साह दिसून आला
रक्तदान शिबिरात रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, स्वरुपवर्धिनी, श्री गजलक्ष्मी, शिवमुद्रा, गजर प्रतिष्ठान, स्वराज्य ट्रस्ट, उगम प्रतिष्ठान, तालगर्जना, मैत्री वेलफेअर फाउंडेशन, समर्थ प्रतिष्ठान, नादब्रम्ह ट्रस्ट ढोल ताशा पथकांचा समावेश होता
श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट, पुणे श्री विकास जी पवार (अध्यक्ष), श्री विनायक जी कदम (उपाध्यक्ष), श्री नितीनजी पंडित (कोषाध्यक्ष),
श्री कृष्णकुमार जी गोयल (स्वागताध्यक्ष), सह आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले .

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏



















