नागरिकांना दिलासा देण्यासाठी पोलीस व महापालिका अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष पाहणी; तातडीच्या उपाययोजनांचे निर्देश
पुणे | प्रतिनिधी : दी. 5 जून 2026 प्रभाग क्रमांक ८ मधील बोपडी, खडकी आणि औंध परिसरात वारंवार निर्माण होणारी वाहतूक कोंडी आणि वाढत्या अतिक्रमणांच्या समस्येची गंभीर दखल घेत आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज संबंधित भागांचा प्रत्यक्ष पाहणी दौरा केला. नागरिकांना आणि वाहनचालकांना दररोज भेडसावणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी त्यांनी पोलीस प्रशासन आणि पुणे महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत विविध चौकांची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला.
या दौऱ्यात अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, डीसीपी भाजीभाकरे, खडकी व चतुःश्रुंगी वाहतूक विभागाचे अधिकारी, तसेच पुणे महानगरपालिकेच्या पथ विभाग, बांधकाम विभाग, अतिक्रमण निर्मूलन विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि औंध वॉर्ड कार्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते.
पथकाने परिसरातील प्रमुख चौक, रस्ते आणि वाहतूक कोंडीची समस्या असलेल्या ठिकाणांची पाहणी केली. या भागांमध्ये अतिक्रमणांबाबत नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्त झाल्या असल्याने आमदार शिरोळे यांनी संबंधित विभागांना त्वरित प्रत्यक्ष तपासणी करून आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले.
बोपडी, खडकी आणि औंध परिसरातील अनेक चौकांमध्ये दररोज मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिक आणि वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महापालिका आणि वाहतूक पोलिसांमध्ये प्रभावी समन्वय साधून पर्यायी वाहतूक आराखडा तयार करण्यात येणार असल्याचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी यावेळी सांगितले.
नागरिकांच्या दैनंदिन प्रवासात अडथळे निर्माण करणाऱ्या वाहतूक कोंडी व अतिक्रमणांच्या समस्यांवर लवकरच ठोस उपाययोजना राबवून परिस्थितीत सुधारणा घडवून आणण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏






















