Homeपुणेबोपोडी - खडकी-औंध मधील वाहतूक कोंडी व अतिक्रमणांवर आमदार सिद्धार्थ शिरोळे यांचा...

बोपोडी – खडकी-औंध मधील वाहतूक कोंडी व अतिक्रमणांवर आमदार सिद्धार्थ शिरोळे यांचा पाहणी दौरा

नागरिकांना दिलासा देण्यासाठी पोलीस व महापालिका अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष पाहणी; तातडीच्या उपाययोजनांचे निर्देश

पुणे | प्रतिनिधी : दी. 5 जून 2026                      प्रभाग क्रमांक ८ मधील बोपडी, खडकी आणि औंध परिसरात वारंवार निर्माण होणारी वाहतूक कोंडी आणि वाढत्या अतिक्रमणांच्या समस्येची गंभीर दखल घेत आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज संबंधित भागांचा प्रत्यक्ष पाहणी दौरा केला. नागरिकांना आणि वाहनचालकांना दररोज भेडसावणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी त्यांनी पोलीस प्रशासन आणि पुणे महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत विविध चौकांची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला.

या दौऱ्यात अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, डीसीपी भाजीभाकरे, खडकी व चतुःश्रुंगी वाहतूक विभागाचे अधिकारी, तसेच पुणे महानगरपालिकेच्या पथ विभाग, बांधकाम विभाग, अतिक्रमण निर्मूलन विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि औंध वॉर्ड कार्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते.
पथकाने परिसरातील प्रमुख चौक, रस्ते आणि वाहतूक कोंडीची समस्या असलेल्या ठिकाणांची पाहणी केली. या भागांमध्ये अतिक्रमणांबाबत नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्त झाल्या असल्याने आमदार शिरोळे यांनी संबंधित विभागांना त्वरित प्रत्यक्ष तपासणी करून आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले.
बोपडी, खडकी आणि औंध परिसरातील अनेक चौकांमध्ये दररोज मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिक आणि वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महापालिका आणि वाहतूक पोलिसांमध्ये प्रभावी समन्वय साधून पर्यायी वाहतूक आराखडा तयार करण्यात येणार असल्याचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी यावेळी सांगितले.
नागरिकांच्या दैनंदिन प्रवासात अडथळे निर्माण करणाऱ्या वाहतूक कोंडी व अतिक्रमणांच्या समस्यांवर लवकरच ठोस उपाययोजना राबवून परिस्थितीत सुधारणा घडवून आणण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महामंडळाच्या निवडणुकीत खळबळ! ‘दोन्ही पॅनल एकाच नाण्याच्या दोन बाजू’; अपक्ष उमेदवार शरद लोणकर यांचा...

महामंडळ आणि सदस्यांच्या हितासाठी आठ अपक्ष उमेदवार एकत्र; प्रस्थापितांच्या कारभारावर जोरदार टीका पुणे | प्रतिनिधी : दी. 4 जून 2026 अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या आगामी...

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या 143 व्या जयंतीनिमित्त खडकीत प्रतिमा पूजन

सकल हिंदू समाजाच्या वतीने अभिवादन; विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती खडकी | प्रतिनिधी : दी. 1 जून 2026            स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर...

सारसबाग बंद निर्णयावर मिस फरहा चॅरिटेबल फाउंडेशनचा आक्षेप, प्रशासनाने फेरविचार करावा अशी मागणी

“सुरक्षेच्या कारणांचा आधार घेत विशिष्ट समाजाला लक्ष्य केल्याचा संशय” — डॉ. फरहा शेख यांचे निवेदन बोपोडी | प्रतिनिधी : दी. 27 मे 2026 बकरी ईदनंतर पारंपरिक...

खडकी छावणीतील हातगाडी परवाना धारकांना मुदतवाढ द्या, सारथी सोशल फाउंडेशनची मागणी

कागदपत्रे अपूर्ण राहिल्याने अनेक हातगाडी व्यावसायिक अडचणीत; खडकी छावणी परिषदेला निवेदन सादर खडकी | प्रतिनिधी : दी. 26 मे 2026           ...

पीसीएमसीचा अतिक्रमणधारकांना इशारा; १५ दिवसांत पदपथ मोकळे करा, अन्यथा कठोर कारवाई

नागरिकांच्या सुरक्षित व विनाअडथळा प्रवासासाठी महापालिकेची मोहीम तीव्र; क्षेत्रीय कार्यालयनिहाय कारवाईचा आढावा पिंपरी | प्रतिनिधी : दि. 26 मे 2026           ...

error: Content is protected !!