रहाटणी–पिंपळे सौदागर प्रभाग २८ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा भव्य प्रचार शुभारंभ सोहळा
पिंपळे सौदागर / प्रतिनिधी : दि. २१ डिसेंबर २०२५
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रभाग क्रमांक २८ (रहाटणी–पिंपळे सौदागर) येथे भव्य प्रचार शुभारंभ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची भूमिका जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे.
या प्रचार शुभारंभ सोहळ्यास विठ्ठल उर्फ नाना काटे, शीतल विठ्ठल (नाना) काटे, .मीनाक्षी अनिल काटे तसेच सायली उमेश काटे यांची प्रमुख उपस्थिती असणारआहे. स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.
हा भव्य प्रचार शुभारंभ सोहळा
रविवार, दिनांक २१ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ठीक ५.०० वाजता
ग्रामदैवत श्री मुंजोबा महाराज मंदिर, पिंपळे सौदागर येथे संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारधारेचा प्रचार, स्थानिक प्रश्नांवर चर्चा तसेच आगामी काळातील विकास आराखड्याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. प्रभागातील नागरिकांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏






















