पुणे पीसीएमसी न्यूज 24:Live
खडकी / प्रतिनिधी : भारताचे क्रांतिकारक वीर व युवकांचे आदर्श असलेले शहीद भगतसिंग यांची जयंती देशभरात उत्साहात साजरी करण्यात आली. मात्र दापोडी येथे उभारण्यात आलेले भगतसिंग स्मारक मात्र पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या दुर्लक्षामुळे स्मारक परिसरात हातगाड्या व फेरीवाल्यांचे अतिक्रमण झाले असून परिसराची स्वच्छता आणि सौंदर्य पूर्णतः बिघडले आहे.
या गंभीर बाबीकडे वंदे मातरम संघटनेने लक्ष वेधले. सकाळी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्मारकावर जाऊन शहीद भगतसिंग यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी संघटनेचे खडकी विभाग अध्यक्ष शिरीष रोच म्हणाले,
“स्वातंत्र्यासाठी हसत हसत फाशीच्या फासावर जाणाऱ्या भगतसिंग यांच्या स्मारकाची अवस्था पाहून अत्यंत वेदना होतात. युवकांसाठी प्रेरणास्थान असलेल्या या ठिकाणी महापालिकेकडून कोणतीही देखभाल केली जात नाही. पुतळ्याभोवती अतिक्रमण झाले असून स्वच्छतेचा प्रश्न गंभीर आहे. प्रशासनाने तातडीने लक्ष घालून स्मारक परिसर सुशोभित करावा.”
एकीकडे पिंपरी- चिंचवड शहरांमध्ये राष्ट्रपुरुषांचे मोठमोठे भव्य पुतळे उभारून सुशोभीत करणार्या पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेला देशासाठी फासावर जाणाऱ्या क्रांतिकारकांचा विसर का पडावा ? याचे कोडे उलगडत नाही. काही वर्षांपूर्वी मुंबई- पुणे महामार्गावरील रस्ता रुंदी करण्याच्या कामाकरिता येथील शहीद नारायण दाभाडे व शहीद भगतसिंग यांचे पुतळे हटविण्यात आले होते, त्यानंतर या पुतळ्यांना अडगळीत टाकून बरेच वर्षे पुतळ्यांचे पुनर्वसन करण्यात न आल्याने वंदेमातरम संघटनेने केलेल्या आंदोलनामुळे येथील पुतळे पुन्हा बसविण्यात आले, परंतु अतिक्रमणामुळे पुतळे नेहमी झाकले जात असल्याने, येथून दुसरीकडे हलविण्याची मागणी संघटनेने केली होती, परंतु तोंडी आश्वासन पलीकडे महानगरपालिकेचे वतीने पुढे कुठलीच कार्यवाही करण्यात आलेली नाही, इतर राष्ट्रपुरुषांना जातींचा शिक्का लाभलेला आहे, परंतु या क्रांतिकारकांच्या मागे तसं जातीचा कुठलाही शिक्का नसल्याने यांची उपेक्षा केली जाते की काय ?अशी शंका येते ?
तरी यापुढील काळात किमान जयंती व पुण्यतिथीच्या दिवशी पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेने सभोवतालचे अतिक्रमण हटवून या क्रांतिकारकांचा आदर राखावा किंवा या ठिकाणी निगा राखणे शक्य नसल्यास शहीद भगतसिंग व नारायण दाभाडे यांचे पुतळे दुसऱ्या ठिकाणी हलवून सुशोभित करावे जेणेकरून राष्ट्रप्रेमींच्या भावना दुखावल्या जाणार नाही अशी मागणी वंदेमातरम संघटनेच्या वतीने रोच यांनी केली.
यापर्सनगी वंदेमातरम संघटनेचे प्रांत कार्याध्यक्ष राजेश शर्मा, खडकी विभाग अध्यक्ष शिरीष रोच, राजेश काकडे, आशिष अग्रवाल, दीपक चार्य हे उपस्थित होते.शहराच्या प्रतिमेला शोभणारी नाही. किमान शहीदांच्या स्मारकाबाबत तरी प्रशासनाने संवेदनशीलता दाखवावी,” असे मत काही नागरिकांनी व्यक्त केले.


मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏






















