Homeखडकीदापोडी येथे शहीद भगतसिंग जयंती पिंपरी चिंचवड महापालिकेच्या दुर्लक्षामुळे स्मारकाची दुरावस्था

दापोडी येथे शहीद भगतसिंग जयंती पिंपरी चिंचवड महापालिकेच्या दुर्लक्षामुळे स्मारकाची दुरावस्था

पुणे पीसीएमसी न्यूज 24:Live

खडकी / प्रतिनिधी : भारताचे क्रांतिकारक वीर व युवकांचे आदर्श असलेले शहीद भगतसिंग यांची जयंती देशभरात उत्साहात साजरी करण्यात आली. मात्र  दापोडी येथे उभारण्यात आलेले भगतसिंग स्मारक मात्र पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या दुर्लक्षामुळे स्मारक परिसरात हातगाड्या व फेरीवाल्यांचे अतिक्रमण झाले असून परिसराची स्वच्छता आणि सौंदर्य पूर्णतः बिघडले आहे.
या गंभीर बाबीकडे वंदे मातरम संघटनेने लक्ष वेधले. सकाळी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्मारकावर जाऊन शहीद भगतसिंग यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी संघटनेचे खडकी विभाग अध्यक्ष शिरीष रोच  म्हणाले,
“स्वातंत्र्यासाठी हसत हसत फाशीच्या फासावर जाणाऱ्या भगतसिंग यांच्या स्मारकाची अवस्था पाहून अत्यंत वेदना होतात. युवकांसाठी प्रेरणास्थान असलेल्या या ठिकाणी महापालिकेकडून कोणतीही देखभाल केली जात नाही. पुतळ्याभोवती अतिक्रमण झाले असून स्वच्छतेचा प्रश्न गंभीर आहे. प्रशासनाने तातडीने लक्ष घालून स्मारक परिसर सुशोभित करावा.”
एकीकडे पिंपरी- चिंचवड शहरांमध्ये राष्ट्रपुरुषांचे मोठमोठे भव्य पुतळे उभारून सुशोभीत करणार्‍या पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेला देशासाठी फासावर जाणाऱ्या क्रांतिकारकांचा विसर का पडावा ? याचे कोडे उलगडत नाही. काही वर्षांपूर्वी मुंबई- पुणे महामार्गावरील रस्ता रुंदी करण्याच्या कामाकरिता येथील शहीद नारायण दाभाडे व शहीद भगतसिंग यांचे पुतळे हटविण्यात आले होते, त्यानंतर या पुतळ्यांना अडगळीत टाकून बरेच वर्षे पुतळ्यांचे पुनर्वसन करण्यात न आल्याने वंदेमातरम संघटनेने केलेल्या आंदोलनामुळे येथील पुतळे पुन्हा बसविण्यात आले, परंतु अतिक्रमणामुळे पुतळे नेहमी झाकले जात असल्याने, येथून दुसरीकडे हलविण्याची मागणी संघटनेने केली होती, परंतु तोंडी आश्वासन पलीकडे महानगरपालिकेचे वतीने पुढे कुठलीच कार्यवाही करण्यात आलेली नाही, इतर राष्ट्रपुरुषांना जातींचा शिक्का लाभलेला आहे, परंतु या क्रांतिकारकांच्या मागे तसं जातीचा कुठलाही शिक्का नसल्याने यांची उपेक्षा केली जाते की काय ?अशी शंका येते ?
तरी यापुढील काळात किमान जयंती व पुण्यतिथीच्या दिवशी पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेने सभोवतालचे अतिक्रमण हटवून या क्रांतिकारकांचा आदर राखावा किंवा या ठिकाणी निगा राखणे शक्य नसल्यास शहीद भगतसिंग व नारायण दाभाडे यांचे पुतळे दुसऱ्या ठिकाणी हलवून सुशोभित करावे जेणेकरून राष्ट्रप्रेमींच्या भावना दुखावल्या जाणार नाही अशी मागणी वंदेमातरम संघटनेच्या वतीने रोच यांनी  केली.
यापर्सनगी  वंदेमातरम संघटनेचे प्रांत कार्याध्यक्ष राजेश शर्मा, खडकी विभाग अध्यक्ष शिरीष रोच, राजेश काकडे, आशिष अग्रवाल, दीपक चार्य हे उपस्थित होते.शहराच्या प्रतिमेला शोभणारी नाही. किमान शहीदांच्या स्मारकाबाबत तरी प्रशासनाने संवेदनशीलता दाखवावी,” असे मत काही नागरिकांनी व्यक्त केले.

Oplus_131072
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सारसबाग बंद निर्णयावर मिस फरहा चॅरिटेबल फाउंडेशनचा आक्षेप, प्रशासनाने फेरविचार करावा अशी मागणी

“सुरक्षेच्या कारणांचा आधार घेत विशिष्ट समाजाला लक्ष्य केल्याचा संशय” — डॉ. फरहा शेख यांचे निवेदन बोपोडी | प्रतिनिधी : दी. 27 मे 2026 बकरी ईदनंतर पारंपरिक...

खडकी छावणीतील हातगाडी परवाना धारकांना मुदतवाढ द्या, सारथी सोशल फाउंडेशनची मागणी

कागदपत्रे अपूर्ण राहिल्याने अनेक हातगाडी व्यावसायिक अडचणीत; खडकी छावणी परिषदेला निवेदन सादर खडकी | प्रतिनिधी : दी. 26 मे 2026           ...

पीसीएमसीचा अतिक्रमणधारकांना इशारा; १५ दिवसांत पदपथ मोकळे करा, अन्यथा कठोर कारवाई

नागरिकांच्या सुरक्षित व विनाअडथळा प्रवासासाठी महापालिकेची मोहीम तीव्र; क्षेत्रीय कार्यालयनिहाय कारवाईचा आढावा पिंपरी | प्रतिनिधी : दि. 26 मे 2026           ...

पुण्यात मुस्लिम समाजाची गाईला ‘राष्ट्रीय प्राणी’ घोषित करण्याची मागणी

सामाजिक सलोखा, शांतता आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पुणे | प्रतिनिधी : दि. 26 मे 2026               ...

पुणे शहर काँग्रेसच्या नवनिर्वाचित शहराध्यक्षांचा जनहित जागृती मंचतर्फे सत्कार

डॉ. विश्वजीत कदम यांना शॉल व संविधान पुस्तक भेट देत मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव बोपोडी | प्रतिनिधी : दि. 23 मे 2026         ...

error: Content is protected !!