जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत सचिन शिराळे याला एक सुवर्ण, दोन रौप्यपदक
पुणे | खडकी : पुणे पीसीएमसी न्यूज 24.live
दि. 20 एप्रिल 2026 : जागतिक मास्टर्स अॅथलेटिक्स स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करणारा आंतरराष्ट्रीय खेळाडू सचिन शिराळे याने एक सुवर्णपदक आणि दोन रौप्यपदकाची कमाई करत नेत्रदीपक कामगिरी केली आहे.
वर्ल्ड मास्टर्स स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने स्पर्धा थायलंड येथे शुक्रवार (दि.17) ते रविवार (दि.19) या कालावधीत झाली. सचिन याने 40 वर्षांखालील पुरूषाच्या 5 हजार मीटर चालणे प्रकारात 31 मिनिटे 14 सेकंद वेळ नोंदवत प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णपदक जिंकले. पाच हजार मीटर धावणे प्रकारात 22 मिनिटे 53 सेकंद वेळ देत, दुसरा क्रमांक मिळवत रौप्यपदक काबीज केले. तर, 1 हजार 500 मीटर धावणे प्रकारात 6 मिनिटे 49 सेकंद वेळ देत, दुसर्या स्थानी राहत रौप्यपदक प्राप्त केले. तेथील 46 डिंग्री अतिउष्ण वातावरणात त्याने ही चमकदार कामगिरी केली आहे.
तो खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचा कर्मचारी असून, खडकीतील पुणे अॅथलेटिक्स फाउंडेशनचा सदस्य आहे. या पूर्वी त्याने श्रीलंका येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते. तसेच, राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेत आणि अर्धमॅरेथॉन शर्यतीत यशस्वी कामगिरी केली आहे. या यशाबद्दल सचिन याचे परिसरात कौतुक होत आहे, अशी माहिती फाउंडेशनचे कार्याध्यक्ष महादेव नाईक यांनी दिली आहे.

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏






















