मान्यवरांच्या उपस्थितीत पुतळ्यास अभिवादन, सत्कार सोहळा आणि जनजागृती उपक्रमांनी रंगला परिसर
बोपोडी | पुणे पीसीएमसी न्यूज 24.live दि. १९ एप्रिल २०२६ विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती, बोपोडी (पुणे-२०) तसेच जनहित जागृती मंच यांच्या वतीने आयोजित जयंती महोत्सव २०२६ उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या प्रसंगी संस्थापक-अध्यक्ष विजय विनायक जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेविका भक्ती गायकवाड यांच्या शुभहस्ते अभिवादन करण्यात आले. त्यानंतर भक्ती गायकवाड यांचा संविधान आणि शाल देऊन सत्कार करण्यात आला. तसेच माजी महापौर दीप्ती चौधरी यांचाही संविधान, शाल व पुष्प देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाला अभिजित गायकवाड व त्यांच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली. तसेच माजी नगरसेवक नंदलाल धिवार , आनंद छाजेड बोपोडी वाहतूक पोलीस विभागाचे केंद्रे , तसेच बोपोडी पोलीस चौकीचे सह्ययक पोलीस निरीक्षक देठे यांचा दीप्ती चौधरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पोलीस अधिकारी, महिला PSI, पोलीस कर्मचारी व होमगार्ड यांचाही संविधान, शाल व उपरणे देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग येथील फलकांना राजन कांबळे व विजय जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.
कार्यक्रमास बाबा तांबोळी, प्रशांत टेके, अकील मोगल, राजेंद्र भुतडा, अॅड. विठ्ठल अरुडे, विजय जाधव, विजय सरोदे, सुभाष पाडाळे, शीरीष नाईकरे, अंजुम इनामदार, मयुरेश गायकवाड, विनोद सोनवणे यांच्यासह विविध पक्ष व संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महिला पदाधिकाऱ्यांनीही सक्रिय सहभाग नोंदवत भीमसैनिकांचे सत्कार करून थंड पेयांचे वाटप केले. आम्रपाली विजय जगताप, योगिता भोसले, राधा सोनवणे, सुदर्शन हिरवे, संजना जगताप, संगीता गिते आदींनी या उपक्रमात पुढाकार घेतला.
बोपोडीतील मिरवणुकीत सहभागी झालेल्या विविध मंडळे व महिला मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचा पुस्तक व शाल देऊन सत्कार करण्यात आला. तसेच नागरिकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पुस्तके, गुलाब, थंड पेय, पाण्याच्या बाटल्या, पेढे व निळी उपरणे वाटप करण्यात आली. यामुळे संपूर्ण परिसरात उत्सवमय वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमाचे आयोजन संयोजक समितीचे संस्थापक-अध्यक्ष विजय विनायक जगताप, विजय ढोणे, राजन कांबळे, गणेश कांबळे, अॅड. गणेश कांबळे, दशरथ मोरे, संजना जगताप, योगिता भोसले, संगीता गिते व सर्व महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यशस्वीरीत्या पार पाडले.

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏

















