Homeपुणेबोपोडीत प्लास्टिकमुक्त उपक्रमाला चालना – पक्षी विहारात प्लास्टिक बॉटल संकलन बिन बसविला

बोपोडीत प्लास्टिकमुक्त उपक्रमाला चालना – पक्षी विहारात प्लास्टिक बॉटल संकलन बिन बसविला

पाच इनर व्हील क्लब्सचा संयुक्त पुढाकार; पर्यावरण संवर्धनासोबत प्रभावी ब्रँडिंग

बोपोडी | पुणे पीसीएमसी न्यूज 24.live                    दि. 19 एप्रिल 2026
बोपोडी येथील छत्रपती शाहू महाराज पक्षी विहारात पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छता राखण्यासाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला आहे. पाच इनर व्हील क्लब्सच्या संयुक्त विद्यमाने पक्षी विहार परिसरात प्लास्टिक बॉटल संकलनासाठी विशेष बिन बसविण्यात आला आहे.

या उपक्रमात इनर व्हील क्लब ऑफ बाणेर हिल्स, इनर व्हील क्लब ऑफ पुणे, इनर व्हील क्लब ऑफ पुणे विंग्ज, इनर व्हील क्लब ऑफ पूना नॉर्थ आणि इनर व्हील क्लब ऑफ पुणे क्विन्स यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. नागरिकांच्या सोयीसाठी बागेतील गर्दीच्या ठिकाणी मोठ्या क्षमतेचा हा बिन उभारण्यात आला आहे.
या उपक्रमामागील प्रमुख उद्देश म्हणजे प्लास्टिक कचऱ्याचे प्रमाण कमी करून परिसर स्वच्छ आणि पर्यावरणपूरक ठेवणे. नागरिकांनी या बिनचा योग्य वापर करून प्लास्टिकमुक्त वातावरण निर्मितीस हातभार लावावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, या बिनमध्ये जमा होणारा प्लास्टिक कचरा पुनर्वापरासाठी पाठविण्याची जबाबदारी बाग प्रशासनाने स्वीकारली आहे. त्यामुळे हा उपक्रम केवळ स्वच्छतेपुरता मर्यादित न राहता टिकाऊ पर्यावरण व्यवस्थापनाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरत आहे.
पक्षी निरीक्षण आणि जॉगिंगसाठी मोठ्या संख्येने नागरिक या विहारात येत असल्याने या बिनचा प्रभावी वापर होईल, असा विश्वास बागेचे गार्ड श्री. सुपेकर यांनी व्यक्त केला.
एकूणच, इनर व्हील संस्थेच्या सामाजिक बांधिलकीचे हे उत्तम उदाहरण ठरले असून, पर्यावरणपूरक उपक्रमासोबतच संस्थेच्या ब्रँडिंगलाही चालना देणारा हा उपक्रम ठरला आ

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!