खडकी / प्रतिनिधी : दिनांक ६ डिसेंबर २०२५ खडकी परिसरात दत्त जयंतीचे औचित्य साधत एक सामाजिक आणि प्राणिप्रेमी उपक्रम राबविण्यात आला. श्री दत्तांच्या आवडत्या प्राण्यांपैकी कुत्रा असल्याने, भटक्या कुत्र्यांचे संरक्षण आणि अपघातांची शक्यता कमी करण्याच्या उद्देशाने त्यांच्या गळ्यात लाल रंगाचे रेडियम चे रिफ्लेक्टिव्ह बेल्ट घालण्यात आले.

संध्याकाळी आणि काळोख्या रात्री रस्त्यावर फिरणारे कुत्रे वाहन चालकांना दिसत नाहीत, यामुळे कुत्र्यांचे तसेच दुचाकीस्वारांचे अपघात होण्याची शक्यता वाढते. या पार्श्वभूमीवर हे बेल्ट अंधारात चमकून वाहनचालकांना सावध करतात आणि अपघातांची शक्यता कमी प्रमाणात होऊ शकते .

हा उपक्रम शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खडकी कॅन्टोन्मेंट विभाग समन्वयक मदन गाडे यांच्या पुढाकाराने राबविण्यात आला. या मोहिमेसाठी खडकीतील प्राणिप्रेमी अस्मिता वेतुरकर यांनी विशेष सहकार्य केले.

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏

















