Homeखडकीवंदेमातरम गीतगायन स्पर्धेत एस व्ही एस शाळेचा मानाचा प्रथम क्रमांक

वंदेमातरम गीतगायन स्पर्धेत एस व्ही एस शाळेचा मानाचा प्रथम क्रमांक

खडकी / प्रतिनिधी : दिनांक ७ डिसेंबर २०२५          वंदेमातरम गीताच्या निर्मितीला एकशे पन्नास वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने, वंदेमातरम संघटना  खडकी विभाग च्या वतीने भव्य वंदेमातरम गीतगायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत एस व्ही एस शाळेने उत्कृष्ट सादरीकरण करत प्रथम क्रमांक पटकाविला.
या स्पर्धेत खडकी परिसरातील नऊ शाळांमधील एकूण २२० विद्यार्थी सहभागी झाले होते. स्पर्धा सोलो गायन आणि समूहगान या दोन प्रकारांत घेण्यात आली.

Oplus_131072                                                                     सोलो गायन निकाल प्रथम : अस्मी आलाप परदेशी , सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूल , द्वितीय : ज्ञानेश्वरी आटोळे , चेतन दत्ताजी गायकवाड इंग्लिश स्कूल तृतीय : आलिया शेख , लोकमान्य टिळक हायस्कूल

समूहगान निकाल
प्रथम : एस व्ही एस शाळा
द्वितीय : जी. एम. आय. कन्या शाळा
तृतीय : लोकमान्य टिळक हायस्कूल

स्पर्धेचे उद्घाटन लालबहादूर शास्त्री हायस्कूलचे मुख्याध्यापक. कवाद सर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून वंदेमातरम गीताचे जनक बंकीमचंद्र चटर्जी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. सुप्रसिद्ध गायक निलेश पोत्रे यांनी महाराष्ट्र गीत गाऊन कार्यक्रमाची सुरुवात केली.
विद्यार्थ्यांच्या देशभक्तीने परिपूर्ण सादरीकरणामुळे संपूर्ण ऑडिटोरियमचा माहोल भारावून गेला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे प्रांत अध्यक्ष विकास हांडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांचे वंशज सत्यशील राजगुरू यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमाला प्रांत कार्याध्यक्ष राजेश शर्मा, ऍड. इंद्रकुमार बन्सल, शरद रोच आदी मान्यवर उपस्थित होते.
परीक्षक म्हणून अविनाश लोंढे, आनंद काजुळकर निवृत्त पोलीस निरीक्षक आणि हरी देवनेसन यांनी काम पाहिले.  प्रास्ताविक शिरीष रोच, सूत्रसंचालन राजेश काकडे, तर निवेदन सागर आठवाल यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विनोद काळे, विजय आठवाल, किशोर भोरे, करण चव्हाण, सोनी आठवाल यांनी विशेष परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!