पुणे पीसीएमसी न्यूज 24:Live
खडकी / विशेष बातमीदार : खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत असलेल्या विविध ठिकाणी इमारती व व्यावसायिक इमारतींवर असलेले मोबाईल टॉवर हे बेकायदेशीर कॅन्टोन्मेंट बोर्डाची कोणतीही लेखी परवानगी नसतानाही लावण्यात आलेली आहेत असा धक्कादायक खुलासा स्वतः खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाने खडकीतील सामाजिक कार्यकर्ते अभिजित गडांकुश यांनी माहितीच्या अधिकारात खडकीतील मोबाईल टॉवर बद्दल मागीतलेल्या माहिती चे उत्तर देताना खडकीतील मोबाईल टॉवर ला बोर्डाने कोणतीही परवानगी नसल्याचे लेखी पत्र गडांकुश यांना दिले आहे. त्यामुळे एवढी वर्षे या मोबाईल टॉवर वर बोर्डाने कारवाई का केली नाही यामागचे कारण काय असा सवाल खडकीतील सुज्ञ नागरिकांनी उपस्थित केला आहे.
खडकी बाजारातील मुख्य बाजारपेठेत कसाई मोहोल्ला, महात्मा गांधी चौक, पीएमपीएल बस स्थानक, संजय गांधी भाजी मार्केट जवळ, सर्वत्र मोठमोठे मोबाईल टॉवर छोट्या मोठ्या इमारतींवर लावण्यात आलेले आहेत खडकीतील काही इमारती अत्यंत धोकादायक आहेत, विशेष म्हणजे हे सर्व टॉवर दाट लोकवस्तीच्या ठिकाणी भाजी मंडई, बाजारपेठ याठिकाणी मोठ्या प्रमाणात आहेत भविष्यात जर मोबाईल टॉवर पडून जीवितहानी झाली यास जवाबदार कोण ? असा प्रश्न अभिजित गडांकुश यांनी बोर्डाला केला आहे.

बोर्डाने हे बेकायदेशीर मोबाईल टॉवर काढावे अशी मागणी अनेकवेळा केली मात्र ढिम्म बोर्ड प्रशासन याकडे कानाडोळा करीत असून उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने अभिजित गडांकुश यांनी खडकी बोर्डासमोर त्यांच्या काही सहकार्यासमावेत गुरुवार ११ सप्टेंबर दुपारी २ वाजता आंदोलन करण्याचा इशारा दिला होता
खडकी बोर्डाने आंदोलन करण्यास परवानगी नाकारली
अभिजित गडांकुश यांना बोर्डाने आंदोलन करण्यास मनाई केले आहे तसे पत्र बोर्डाने अभिजित गडांकुश यांच्या मोबाईल वर व्हाट्सअप द्वारे बुधवार ता. १० सप्टेंबर संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास पाठवल्याचे अभिजित गडांकुश यांनी सांगितले आहे. खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालय सहा वाजता बंद होते बोर्डाने साडेसहा वाजता व्हाट्सअप द्वारे पत्र देणे हे अधिकृत आहे का ? असा सवाल ही गडांकुश यांनी उपस्थित केला आहे.
खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मीनाक्षी लोहिया यांच्याशी संपर्क करण्याचा पुणे पीसीएमसी न्यूज 24 च्या प्रतिनिधी ने केला संपर्क होऊ शकला नाही

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏






















