Homeखडकीखडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत चक्क बेकायदेशीर मोबाईल टॉवर माहितीच्या अधिकारात माहिती उघड

खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत चक्क बेकायदेशीर मोबाईल टॉवर माहितीच्या अधिकारात माहिती उघड

पुणे पीसीएमसी न्यूज 24:Live

खडकी / विशेष बातमीदार :  खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत असलेल्या विविध ठिकाणी इमारती व  व्यावसायिक इमारतींवर असलेले मोबाईल टॉवर हे  बेकायदेशीर कॅन्टोन्मेंट बोर्डाची कोणतीही लेखी परवानगी नसतानाही लावण्यात आलेली आहेत असा धक्कादायक खुलासा स्वतः खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाने खडकीतील सामाजिक कार्यकर्ते अभिजित गडांकुश यांनी माहितीच्या अधिकारात खडकीतील मोबाईल टॉवर बद्दल मागीतलेल्या माहिती चे उत्तर देताना खडकीतील मोबाईल टॉवर ला बोर्डाने कोणतीही परवानगी नसल्याचे लेखी पत्र गडांकुश यांना दिले आहे. त्यामुळे एवढी वर्षे या मोबाईल टॉवर वर बोर्डाने कारवाई का केली नाही यामागचे कारण काय असा सवाल खडकीतील सुज्ञ नागरिकांनी उपस्थित केला आहे.

खडकी बाजारातील मुख्य बाजारपेठेत कसाई मोहोल्ला, महात्मा गांधी चौक, पीएमपीएल बस स्थानक, संजय गांधी भाजी मार्केट जवळ,  सर्वत्र मोठमोठे मोबाईल टॉवर छोट्या मोठ्या इमारतींवर लावण्यात आलेले आहेत खडकीतील काही इमारती अत्यंत धोकादायक आहेत, विशेष म्हणजे हे सर्व टॉवर दाट लोकवस्तीच्या ठिकाणी भाजी मंडई, बाजारपेठ याठिकाणी मोठ्या प्रमाणात आहेत भविष्यात जर मोबाईल टॉवर पडून जीवितहानी झाली यास जवाबदार कोण ? असा प्रश्न अभिजित गडांकुश यांनी बोर्डाला केला आहे.

Oplus_131072

बोर्डाने हे बेकायदेशीर मोबाईल टॉवर काढावे अशी मागणी अनेकवेळा केली मात्र ढिम्म बोर्ड प्रशासन याकडे कानाडोळा करीत असून उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने अभिजित गडांकुश यांनी खडकी बोर्डासमोर त्यांच्या काही सहकार्यासमावेत गुरुवार ११ सप्टेंबर दुपारी २ वाजता आंदोलन करण्याचा इशारा दिला होता 

खडकी बोर्डाने आंदोलन करण्यास परवानगी नाकारली

अभिजित गडांकुश यांना बोर्डाने आंदोलन करण्यास मनाई केले आहे तसे पत्र बोर्डाने अभिजित गडांकुश यांच्या मोबाईल वर व्हाट्सअप द्वारे बुधवार  ता. १० सप्टेंबर संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास पाठवल्याचे अभिजित गडांकुश यांनी सांगितले आहे. खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालय सहा वाजता बंद होते बोर्डाने साडेसहा वाजता व्हाट्सअप द्वारे पत्र देणे हे अधिकृत आहे का ? असा सवाल ही गडांकुश यांनी उपस्थित केला आहे.

खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मीनाक्षी लोहिया यांच्याशी संपर्क करण्याचा पुणे पीसीएमसी न्यूज 24 च्या प्रतिनिधी ने केला संपर्क होऊ शकला नाही

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!