अतिक्रमण कारवाई की मनमानी? जप्त प्लास्टिक मालावरून मनसे आक्रमक!
पुणे | प्रतिनिधी : दि.३ मार्च २०२६
महाराष्ट्र नवनिर्माण सेना, पुणे शहराच्या वतीने पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना निवेदन देत अतिक्रमण कारवाईदरम्यान जप्त केलेला प्लास्टिक माल तात्काळ परत करण्याची मागणी करण्यात आली आहे.
भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या ७३२, शुक्रवार पेठ येथील श्री मंगल प्लास्टिक दुकानावर दिनांक ८ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास कारवाई करण्यात आली. या कारवाईत प्लास्टिकचे टेबल, स्टूल, स्पेअर जाळी, ड्राय ड्रम, फोल्डिंग स्टूल, प्लास्टिकचे कॅरेट, रॅक तसेच इतर साहित्य जप्त करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.
मनसेच्या निवेदनानुसार, कारवाईदरम्यान जप्त केलेला माल नेमका कुठे नेण्यात आला याची माहिती मिळाली नसून संबंधित अधिकाऱ्यांकडून स्पष्ट उत्तर दिले जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. स्थानिक दुकानदार व मनसे पदाधिकारी संजय तोडमल यांनी याबाबत तक्रार नोंदवली असून, जप्त केलेला माल दोन दिवसांत परत न केल्यास मनसे स्टाईल आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
मनसेचे पुणे शहर उपाध्यक्ष सुहास निम्हण यांनी या निवेदनावर स्वाक्षरी केली असून, “मराठी माणसाला न्याय मिळाला नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल,” असे स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, अतिक्रमण कारवाईतील जप्त मालाबाबत पालिकेची अधिकृत भूमिका काय, याकडे व्यापारी व नागरिकांचे लक्ष लागले आहे.

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏






















